Paytm Shares: आजचा बाजार उघडताच Paytmने मारली बाजी; शेअर्सनी गाठली 5 टक्क्यांची अप्पर लिमिट

Paytm Shares: आज म्हणजेच सोमवारी, आठवड्याच्या पहिल्या दिवशी गुंतवणूकदारांनी Paytm बद्दल (One97 Communications Limited) सकारात्मक प्रतिक्रिया नोंदवली त्यामुळे Paytm च्या शेअर्सची किंमत 5 टक्क्यांनी वाढली आणि ते दिवसाच्या वरच्या मर्यादेपर्यंत पोहोचले. Paytm ने Axis बँक सोबत केलेल्या करारामुळे बाजारात हा बदल दिसून आला याशिवाय, रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया (RBI) ने नुकतेच प्रसिद्ध केलेल्या वारंवार विचारल्या जाणाऱ्या प्रश्नांच्या उत्तर यादी (FAQs) मध्ये Paytm QR, Card Machine आणि Soundbox सेवा 15 मार्चनंतरही चालू राहतील यावर काही स्पष्टता दिल्यामुळे Paytmच्या शेअर्समध्ये तेजी आली.

आज बाजारी स्थिती Paytmच्या बाजूने: (Paytm Shares)

आज सकाळी बाजार सुरू झाल्याबरोबर Paytmच्या शेअर्सची किंमत वाढली आणि त्यामुळे त्यांची एकूण बाजारपेढी किंमत सुमारे 22,773 कोटी रुपयांपर्यंत पोहोचली. ही आतापर्यंतची दुसरी वेळ आहे जेव्हा Paytmचे शेअर्स इतक्या मोठ्या प्रमाणात वाढले आहेत. BSE वर कंपनीचे शेअर्स 5 टक्क्यांच्या वरच्या मर्यादेपर्यंत म्हणजे 358.55 रुपयांपर्यंत पोहोचली आहे.

Paytmने BSEला दिलेल्या नोंदणीमध्ये सांगितले आहे की, ते आता Paytm Payment Bank साठी वापरत असलेले मुख्य खाते बदलून Axis Bank सोबत नवीन व्यवस्था करत आहे. पण यापुढेही Paytm Payment Services Axis Bank च्या सेवांचा वापर करणार आहे. थोडक्यात, Paytm Payment Bank साठी नवीन व्यवस्था सुरु झाली असून, पेटीएम पेमेंट सर्विसिस आधीप्रमाणेच Axis Bank सोबत काम करणार आहे. Paytm त्यांच्या व्यापारी व्यवहारांसाठी लागणारी Nodal/escrow सेवा चांगली आणि सुरक्षित ठेवण्यासाठी प्रयत्नशील आहेत(Paytm Shares). सध्या ते Axis Bank सोबत काम करत असले तरीही त्यांची दुसरा भागीदार शोधण्यासाठी चर्चा सुरू आहे.