Paytm Wallet Business: मुकेश अंबानी बनणार का Paytmचे मालक? जाणून घ्या काय खरं आणि खोटं

Paytm Wallet Business: गेल्या अनेक दिवसांपासून Paytmचे संकट कमी होण्याची चिन्हे दिसत नाहीत. RBI ने बंदी घातल्यामुळे कंपनीला मोठा फटका बसला आहे आणि परिणामी Paytmच्या शेअरमध्ये सातत्याने घसरण झालेली पाहायला मिळत होती. अश्यातच सोमवारी काही बातम्या आल्या होत्या की Paytm चा वॉलेट व्यवसाय विकला जाणार आहे आणि मुकेश अंबानींची JioFinancial Services त्याला खरेदी करण्यात रस दाखवत आहे. या बातमीमुळे JioFin च्या शेअर्समध्ये 14 टक्क्यांची वाढ झाली. मात्र, या बातम्यांमध्ये किती सत्यता आहे यावर आता जिओ आणि Paytm या दोन्ही कंपन्यांकडून स्पष्टीकरण जारी करण्यात आले आहे. चला मग जाणून घेऊयात दोन्ही कंपनीचं म्हणणं आहे तरी काय?

जियो कंपनीच्या शेअर्समध्ये झाली भन्नाट वाढ: (Paytm Wallet Business)

गेल्या काही दिवसांपासून जिओ फायनान्शिअलच्या शेअर्समध्ये लक्षणीय वाढ झाली आहे. ही वाढ अलीकडील अहवालानंतर दिसली, ज्यामध्ये मुकेश अंबानींच्या NBFC कंपनीने Paytmचा वॉलेट व्यवसाय खरेदी करण्याची इच्छा दर्शवली होती. अहवालानुसार, JioFIn One97 Communications शी Paytm चा वॉलेट व्यवसाय खरेदी करण्याबाबत बोलणी करत असल्याची बातमी पसरवली जात होती.

मात्र आता JFSL ने स्टॉक एक्स्चेंजला फाइलिंगमध्ये या बातम्यांबाबत स्पष्टीकरण दिले आहे. कंपनीने स्पष्ट केले की या सर्व बातम्या निव्वळ खोट्या असून त्यांनी या व्यवहाराबाबत कोणतीही चर्चा केलेली नाही. JFSLने पुढे असेही म्हटले की ते घडलेल्या घटनांचे नेहमीच जबाबदारीने खुलासे करत आले आहेत आणि भविष्यातही तेच करतील.

यावर Paytmचे म्हणणे काय?

Paytmने अलीकडेच वॉलेट बिझनेस विकण्याच्या बातम्यांवर स्पष्टीकरण दिले आहे. फिनटेक फर्मने म्हटले आहे की ते कोणत्याही कंपनीशी वॉलेट बिझनेस विकण्याबाबत चर्चा करत नसून कंपनीशी संबंधित सूत्रांनीही हे स्पष्ट केले आहे की विक्रीची कोणतीही चर्चा बाजारात सुरू नाहीत(Paytm Wallet Business). हे लक्षात घेणे महत्त्वाचे आहे की ट्रेडिंगच्या अवघ्या तीन दिवसांत Paytmचे शेअर्स 43 टक्क्यांनी घसरले आहेत आणि कंपनीच्या मार्केट कॅपमध्ये (Market Cap) 20,500 कोटी रुपयांहून अधिक घट झालेली पाहायला मिळाली आहे.