Pernod Ricard: जगप्रसिद्ध मद्य कंपनीने केली महाराष्ट्राची निवड; नागपूरमध्ये करणार 1800 कोटींची गुंतवणूक

Pernod Ricard: फ्रेंच मद्य कंपनी Pernod Ricard ने महाराष्ट्र सरकारसोबत मोठ्या गुंतवणुकीचा करार केला आहे. त्यानुसार, नागपूर येथे भारतातील सर्वात मोठी Malt Distillery उभारण्यात येईल अशी माहिती माध्यमांना मिळाली आहे. ही डिस्टिलरी दिवसाला 60,000 लिटर माल्ट तयार करण्याची क्षमता बाळगेल. कंपनीच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनुसार, हे आशियातील त्यांची सर्वात मोठी Malt Distillery असण्याची शक्यता आहे आणि साहजिकच या गुंतवणुकीमुळे महाराष्ट्राच्या अर्थव्यवस्थेला अजून फायदा मिळेल.

महाराष्ट्रात उभा राहणार Whiskyचा व्यवसाय: (Pernod Ricard)

कंपनीच्या मते ही आशिया खंडातली त्यांची सर्वात मोठी डिस्टिलरी असण्याची शक्यता आहे. या नवीन डिस्टिलरीमुळे भारतातील Whisky उत्पादनात मोठी भर पडेल यात दुमत नाही. फ्रेंच दारू निर्माता कंपनी Pernod Ricard भारतात धमाकेदार एंट्री करण्याची योजना आखत आहे आणि पुढील 10 वर्षांत ते तब्बल 1,785 कोटी रुपये गुंतवणूक करण्यासाठी सज्ज आहेत. या नवीन डिस्टिलरीमुळे त्यांचे भारतातील उत्पादन वाढेल आणि त्यांचा महाराष्ट्रातील व्यवसाय वाढण्यास मदत होईल.

कंपनीच्या अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार डिस्टिलरीचे बांधकाम पूर्ण करण्यासाठी त्यांना दोन वर्षे लागू शकतात, पण एकदा हे बांधकाम पूर्ण झाले की ते महाराष्ट्रात दारू उत्पादनात मोठे नाव बनतील आणि त्यांच्या व्यवसायातून निर्माण होणार कर महाराष्ट्र सरकारसाठी उत्पन्नाचे मोठे साधन बनेल.