Personal Loan: पर्सनल लोन घेताना ‘हे’ प्रश्न नक्की विचारून पहा; भविष्यात कोणतीही समस्या सतावणार नाही

Personal Loan: आपल्या आयुष्यात कधी ना कधी आपल्याला वैयक्तिक कर्ज घेण्याची गरज भासू शकते. अशा परिस्थितीत, योग्य निर्णय घेण्यासाठी स्वतःला काही महत्वाचे प्रश्न विचारणे आवश्यक आहे. या प्रश्नांची उत्तरे तुम्हाला योग्य कर्ज निवडण्यास आणि भविष्यातील आर्थिक अडचणी टाळण्यास मदत करतील.

१. कर्ज घेण्याची गरज आहे का?

सर्वात महत्वाचा प्रश्न म्हणजे आपल्याला खरोखरच कर्ज घेण्याची गरज आहे का? आपण इतर पर्यायांचा विचार केला आहे का? जसे की बचत वापरणे, कुटुंबियांकडून मदत घेणे इत्यादी. कारण कर्ज घेणं म्हणजे डोक्यावर टांगती तलवारच उभी करण्यासारखं आहे.

२. किती कर्ज घ्यायचे?

आपल्याला किती पैशांची गरज आहे याचा अंदाज लावा. फक्त गरजेपेक्षा जास्त कर्ज घेणे टाळा, कारण शेवटी या रकमेची परतफेड केवळ तुम्हालाच करायची आहे आणि हे कर्ज तुमच्यासाठी बोजा बनता नये याची काळजी घ्या.

३. कर्ज कोणत्या व्याजदराने मिळेल?

विविध बँका आणि संस्था वेगवेगळे व्याजदर देतात, म्हणूनच कर्ज घेण्यापूर्वी व्याजदर आणि इतर शुल्कांची तुलना करा. तुमच्या खिशाला परवडेल केवळ अश्याच संस्थेची निवड करा. अनेकदा बँक, NBFC, किंवा क्रेडिट कार्डद्वारे कर्ज घेण्याचा पर्याय उपलब्ध असतात, म्हणूनच प्रत्येक पर्यायाचे फायदे आणि तोटे समजून घ्या आणि आपल्यासाठी योग्य पर्याय निवडा.

४. कर्ज कधी आणि कसे फेडायचे(Personal Loan)?

आपल्या क्षमतेनुसार परतफेड कालावधी निवडा. जास्त कालावधीसाठी कर्ज घेतल्यास व्याज अधिक भरावं लागेल, त्यामुळे आपण किती EMI भरू शकता आणि कर्ज किती काळात फेडू शकता याचा विचार करा.

५. कर्ज घेण्याचा आपल्या क्रेडिट स्कोअरवर काय परिणाम होईल?

कर्ज घेणे आणि वेळेवर परतफेड करणे आपल्या क्रेडिट स्कोअरवर सकारात्मक परिणाम करते. परंतु कर्ज फेडण्यात टाळाटाळ केल्याने आपला क्रेडिट स्कोअर खराब होऊ शकतो आणि त्यांनतर पुढच्यावेळी कोणीही तुम्हाला कर्ज देणार नाही. कमी क्रेडिट स्कोअरचा अर्थ होतो की कर्जाची परतफेड करण्यासाठी तुम्ही सक्षम नाही आहात.

६. कर्ज घेण्यासाठी कोणती कागदपत्रे आवश्यक आहेत?

कर्ज घेण्यासाठी आवश्यक असलेल्या कागदपत्रांची यादी तयार करा(Personal Loan). तसेच कर्जावरील प्रक्रिया शुल्क, दंडात्मक व्याज, आणि इतर अटी काय आहेत याची माहिती घ्या, ज्यामुळे येणाऱ्या काळात काही संकटांना सामोरे जावे लागणार नाही.

७. कर्ज घेण्याबाबत कोणत्याही शंका असल्यास काय करावे?

सर्वात शेवटी कर्ज घेण्याबाबत कोणत्याही शंका असल्यास बँकेच्या प्रतिनिधीशी किंवा आर्थिक सल्लागाराशी बोलण्यास अजिबात संकोच करू नका.