Petrol Diesel Price: LPG गॅस नंतर आता पेट्रोल- डिझेलचे दर कमी होणार? मोदी सरकार मास्टरस्ट्रोक खेळणार ?

बिझनेसनामा ऑनलाईन । महागाईच्या जाळ्यात आपण सगळेच अडकलो आहोत. फळ भाज्यांपासून सर्वच गोष्टींची किंमत अचानक वाढत जाते. हल्लीच झालेलं टोमेटोचं प्रकरण काही फार जुनं नाही. मात्र आत काही महिन्यात होणाऱ्या लोकसभा निवडणुकीमुळे जनतेला खुश करण्यासाठी सरकारकडून अनेक लोकोपयोगी निर्णय घेतले जातील आणि महागाई आटोक्यात आणण्यासाठी प्रयत्न केले जातील अशी शक्यता आहे. काही दिवसांपूर्वी केंद्र सरकारने LPG गॅसच्या किमती कमी केल्या होत्या. त्यानंतर आता पेट्रोल आणि डिझेलच्या ( Petrol Diesel Price) किंमतीसुद्धा कमी होणार का याकडे सर्वसामान्य माणूस लक्ष ठेऊन आहे.

पेट्रोल- डिझेलच्या किमती कमी होणार का? Petrol Diesel Price

अद्याप तरी Petrol Diesel च्या किंमतीत घसरण होण्याबद्दल काही बातमी समोर आलेली नाही. मात्र JM Financials या ब्रोकरेज कंपनीने लावलेल्या अंदाजानुसार, येत्या दिवाळी पर्यंत पेट्रोल आणि डिझेलच्या किंमतीत (Petrol Diesel Price) फरक पडू शकतो. सरकार कडून येणाऱ्या काळात 3 ते 5 रुपये कमी करण्याची घोषणा केली जाऊ शकते असा अंदाज या कंपनीने लावला आहे. आपण पेट्रोल आणि डीझेलसाठी अरब देशांवर अवलंबून आहोत. ब्रोकरेजच्या म्हणण्यानुसार सरकार पेट्रोल आणि डीझेलच्या एक्सैझ ड्युटीवर कट आऊट लावू शकते. मात्र कच्च्या तेलाची किंमत जास्ती असल्यामुळे सरकारच्या तिजोरीवर दबाव येऊ शकतो.

आगामी निवडणुका डोळ्यासमोर ठेऊन सरकार मारणार मास्टरस्ट्रोक?

नोव्हेंबर आणि डिसेंबरच्या काळात देशातील पाच राज्यांमध्ये विधानसभेच्या निवडणुका होणार आहेत, त्या नंतर लगेच पुढच्या वर्षी लोकसभेच्या निवडणुका होणार आहेत. त्यामुळे महागाईच्या मुद्यावर जोर्र देत सरकार या किमतींमध्ये बदल घडवून आणू शकतो. असं झाल्यास जनतेसाठी ती सर्वात मोठी आनंदाची बाब ठरणार आहे. तसेच येत्या काळात भारतात अनेक सण उत्सव आहेत. या सर्व पार्श्वभूमीवर पेट्रोल- डिझेलचे दर (Petrol Diesel Price) कमी केल्यास मोदी सरकारला मोठा फायदा होण्याची शक्यता आहे.

यापूर्वी गॅसच्या किमतीत सर्वात मोठी घट –

गेल्या आठवड्यात केंद्र सरकारकडून 14.2 किलो LPG Cylinder च्या किंमतीत 200 रुपयांची सबसिडी जाहीर करण्यात आली. तसेच उज्ज्वला योजनेअंतर्गत गॅस कनेक्शन असणाऱ्यांना 400 रुपयांची सूट सरकार देत आहेत. मोदी सरकारने घेतलेला आत्तापर्यँतचा तो सर्वात मोठा निर्णय आहे. त्यामुळे येत्या काळात पेट्रोल आणि डिझेलच्या किमतीही कमी झाल्यास जनतेला डबल फायदा होईल.