Petrol-Diesel Price : जागतिक पातळीवर कच्या तेलाच्या किमतीत घसरण; पेट्रोल डिझेलचे दर उतरणार??

Petrol-Diesel Price: कालच देशभरात हर्ष आणि उल्हासात ख्रिसमस साजरा करण्यात आला. वर्ष 2023 संपायला आता केवळ पाच दिवस बाकी असून लवकरच आपण नवीन वर्षात पदार्पण करणार आहोत. नवीन वर्ष म्हटलं कि सर्वांच्याच मनात चांगली बातमी ऐकू येण्याची आस लपलेली असते. कुणी पगारवाढीची वाट पाहत असतो तर कुणाला नवीन नोकरी मिळवण्याची इच्छा असते. जगभरात सध्या महागाईचा जोर सर्वाधिक आहे, आणि किमान आता नवीन वर्षाच्या सुरवातीला तरी काही महत्वाच्या वस्तूंची किंमत कमी होईल म्हणून लोकं आशेने बातम्यांकडे पाहत आहेत. आज मात्र आम्ही तुम्हाला निराश करणार नाही, कारण हि बातमी ऐकून तुम्ही नक्कीच खुश होणार आहेत. क्रूड ऑइल म्हणजेच कच्या तेलाच्या किमतींमध्ये जगभरात चढ उतार पाहायला मिळतोय , आणि परिणामी देशभरात पेट्रोल आणि डिझेलच्या किमती कमी होण्याची शकयता वर्तवली जात आहे. पेट्रोल आणि डिझेल यांच्या किमतींमध्ये घसरण झाल्यास सामान्य जनतेला आशेचा किरण दिसेल अशी अशा आहे.

नववर्षात पेट्रोल डिझेलचे दर कमी होणार? (Petrol-Diesel Price)

जागतिक बाजारात सध्या क्रूड ऑइलच्या किमती सातत्याने घसरत असून आता या किमती 80 डॉलर्सच्या खाली म्हणजेच 79.07 प्रति बॅरेल झाली आहेत. या घसरणाऱ्या किमतींमुळे आपोआपच देशातील पेट्रोल आणि डिझेलचे दर बदलतील अशी शक्यता वर्तवली जात आहे. नवीन वर्ष सुरु व्हायला काही दिवस बाकी असताना सामान्य जनतेला आधार देणार अशी एक बातमी समोर आली असे म्हणायला हरकत नाही. गेल्या अनेक दिवसांपासून देशात पेट्रोल आणि डिझेलच्या किमतींमध्ये काहीही बदल झालेला नाही, मात्र सध्या आंतराष्ट्रीय बाजारात क्रूड ऑइलच्या दरांमध्ये बदल होत असल्याने वर्ष 2024 मध्ये देशभरात पेट्रोल-डिझेलच्या किमती बदलू शकतात.

तुम्हाला माहिती आहे का गेल्या 588 दिवसांपासून देशभरात पेट्रोल आणि डिझेलच्या किमती (Petrol-Diesel Price) तिळमात्रही बदलेल्या नाहीत. वर्ष 2022 च्या मे महिन्यात यांच्या किमतींमध्ये शेवटचा मात्र थोडाफार बदल झालेला पाहायला मिळाला होता. भारतात आताच्या घडीला विधानसभा निवडणुकांचे जोरदार वारे वाहत आहे आणि त्यानिमित्ताने जनतेला खुश करण्यासाठी पेट्रोल आणि डिझेलच्या किमती सरकार कमी करू शकते. सध्या मुंबई, चेन्नई आणि कोलकाता या देशातील प्रमुख शहरांमध्ये पेट्रोलच्या किमती 96.72 ते 106.03 रुपयांवर व्यव्यहार करीत आहे, तर डिझेलच्या किमती 89.62 ते 92.76 रुपयांवर व्यवहार करीत आहे. 2023 मध्ये 90 रुपये प्रति बॅरेल प्रमाणे कच्या तेलाची विक्री केली जायची, ज्यात आता दिवसेंदिवस घसरण होत असल्याने त्याचा थेट परिणाम देशातील पेट्रोल आणि डिझेल यांच्या किमतींवर झालेला दिसून येऊ शकतो.