Petrol-Diesel Price : इस्रायल आणि हमास यांच्यात झालेल्या युद्धाचा विपरीत परिणाम संपूर्ण जगावर झाला होता. यातीलच एक म्हणजे कच्या तेलाच्या किमतींमध्ये झालेली घसरण. काही दिवसांपूर्वी आपण एक बातमी पहिली होती कि कच्या तेलाच्या किमतींमध्ये घट झाली आहे, याचं प्रमुख कारण म्हणजे अमेरिकेसारख्या बलाढ्य देशाकडून कच्या तेलाची मागणी कमी झाली होती मात्र कच्या तेलाचा पुरवठा मात्र कायम तसाच होता. अलीकडे कच्या तेलाच्या किमतींमध्ये दिवाळीच्या आधी झालेली घट हि आपल्यासाठी खास व आनंदाची बातमी ठरली होती आणि यानंतर आता पेट्रोल आणि डीजेलच्या किमती तुमची दिवाळी आणखीन आनंदी बनवू शकतील का, काय आहे हि नवीन खबर जाणून घेऊया..
पेट्रोल आणि डीजेलच्या किमती बदलल्या आहे का? (Petrol-Diesel Price)
पेट्रोल आणि डीजेल या आजच्या जगातल्या दोन अत्यंत महत्वाच्या गोष्टींपैकी आहेत. राजधानी दिल्लीमध्ये आज पेट्रोलची किंमत 96.72 रुपये आहे व डीझेल 89.62 वर व्यवहार करत आहे. जागतिक बाजारात कच्या तेलाच्या किमती वर खाली होत असताना आपल्या शहरात पेट्रोल आणि डीजेलची काय किंमत आहे हे जाणून घेऊया. सध्या सर्वत्र दिवाळी उत्सव सुटू आहे. तरीही पेट्रोल आणि डीजेलच्या किमतींमध्ये कोणतेही बदल घडलेले जाणवत नाहीत, आजही या दोन्हीच्या किमती कायम तश्याच आहेत.
काही दिवसांपूर्वी जागतिक स्थरावर कच्या तेलाच्या किमतींमध्ये घट झालेली दिसली. सध्या कच्या तेलाच्या किमती 75 डॉलर्स प्रति बेरल आहे यात ब्रेंट क्रूडची कीमत 75.52 डॉलर प्रति डॉलर असून डब्लूटीआई क्रूडची कीमत 77.53 डॉलर प्रति बेरल आहे. जागतिक स्थरावर जरी कच्या तेलाच्या किमतींमध्ये बदल झालेले असले तरीही याचा सकारात्मक परिणाम आपल्या देशावर होताना दिसत नाही. देशातील काही प्रमुख राज्य म्हणजे दिल्ली(पेट्रोल 96.72 रुपये आणि डीजल 89.62 रुपये प्रति लीटर), कलकत्ता(पेट्रोल 106.03 रुपये आणि डीजल 92.76 रुपये प्रति लीटर), मुंबई(पेट्रोल 106.31 रुपये आणि डीजल 94.27 रुपये प्रति लीटर) आणि चेन्नई(पेट्रोल 102.63 रुपये आणि डीजल 94.24 रुपये प्रति लीटर),या प्रमुख शहरांमध्ये आज पर्यंत पेट्रोल आणि डीजेलच्या किमतींमध्ये कोणतेही बदल झालेले नाहीत.
जर का तुम्हाला घरबसल्या पेट्रोल आणि डीजेलच्या किमतींबद्दल (Petrol-Diesel Price) माहिती हवी असेल तर इंडिअन ऑयलच्या अधिकृत वेबसाईटवर जाऊन 92249 92249 या नंबरावर RSP डीलर कोड टाकून संदेश पाठवा, किंवा तुम्ही इंडियन ऑयच्या एपवर जाऊन नवीन किमती तपासून पाहू शकता.