Lenskart चे संस्थापक पियुष बन्सल यांची संपत्ती किती? कशी सुरू केली कंपनी? पहा संपूर्ण यशोगाथा

बिझनेसनामा ऑनलाइन | ऑनलाइन आणि ऑफलाईन चष्मा विकणारे प्रसिद्ध चष्माघर म्हणून आपण लेन्सकार्ट (Lenskart) कडे पाहतो. भारतातील प्रत्येक मुख्य शहरात लेन्सकार्टचे एखादे तरी आऊटलेट तर दिसतच…. आज कंपनीने संपूर्ण देशात मोठा विस्तार केला असला तरी हे यश मिळवणं नक्कीच सोप्प नव्हतं. लेन्सकार्टचे सीईओ आणि सह संस्थापक पियुष बन्सल यांचं यामागे मोठं कष्ट आहे. शून्यातुन कंपनीची स्थापन करून आज इतका मोठा विस्तार करणं हा बन्सल यांचा संपूर्ण प्रवास आपण जाणून घेऊया….

खरं तर पियुष बन्सल यांचे वडील चार्टड अकाउंट असल्याने त्यांच्या घरची आर्थिक परिस्थिती तशी चांगली होती. नवी दिल्ली मध्ये 26 एप्रिल 1985 ला पियुष बंसल यांचा जन्म झाला. त्यांची संपूर्ण फॅमिली सुरुवातीपासूनच दिल्लीमध्ये राहत होती. पियुष बन्सल यांनी त्यांचे शिक्षण दिल्लीतील डॉन बॉस्को स्कूल मध्ये पूर्ण केले. त्यानंतर कॅनडामधील मैकगील युनिव्हर्सिटीतून इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग मध्ये ग्रॅज्युएशन केले. आणि मग बंगळूर येथील इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट मध्ये पोस्ट ग्रॅज्युएशन पूर्ण केले. peyush bansal lenskart net worth

मायक्रोसॉफ्टमधील नोकरी सोडून सुरू केला व्यवसाय (Lenskart) –

संपूर्ण शिक्षण पूर्ण झाल्यानंतर पियुष यांना 2007 मध्ये अमेरिकेत असलेल्या जगातील सर्वात मोठ्या कंपन्यांपैकी एक म्हणजेच मायक्रोसॉफ्ट कंपनीमध्ये काम करण्याची संधी मिळाली. परंतु स्वतःचा व्यवसाय करण्यामध्ये आवड असल्यामुळे त्यांनी ही नोकरी सोडून भारत गाठलं. आणि त्याच वर्षी त्यांनी सर्च माय कॅम्पस लॉन्च केलं. 2010 मध्ये त्यांनी सुमित कपाटी आणि अमित चौधरी यांच्यासोबत लेन्स कार्ड ची स्थापना केली. सुरुवातीच्या काळात लेन्स कार्ड कंपनी फक्त कॉन्टॅक्ट लेन्स विकत होती. त्यानंतर एका वर्षात सनग्लासेस सह लेन्सेस ची विक्री करण्यास सुरुवात झाली. 2019 ला लेन्स कार्ट कंपनी 1.5 अब्ज एवढ्या संपत्ती सह युनिकॉर्न बनली.

10 हजार करोड संपत्ती –

पियुष बंसल यांची एकूण संपत्ती बघितली तर ती 10000 कोटी एवढी आहे. ऑनलाइन चष्मा विक्री करण्यासाठी लेन्सकार्ट कंपनी प्रसिद्ध आहे. सध्या पीयूष यांच्याकडे सर्वकाही आहे. त्यांच्याकडे ऑडी मर्सिडीज बीएमडब्ल्यू लँड रोव्हर यासारख्या लक्झरी कार आहेत. पूर्वी फक्त लेन्सची विक्री करणाऱ्या लेन्स कार्ड कंपनीने एका वर्षानंतर सनग्लासेस देखील विकण्यास सुरुवात केली. आता त्यांच्याकडे 5000 पेक्षा जास्त फ्रेम आणि चष्मे आहेत. त्याचबरोबर त्यांच्याकडे 46 पेक्षा जास्त वेगवेगळ्या प्रकारचे, चांगल्या क्वालिटीची लेन्स देखील उपलब्ध आहेत. आज संपूर्ण भारतात लेन्सकार्टचे 1600 हुन अधिक आउटलेट आहेत.