आता Phonepe वरून भरा तुमचा ITR; कंपनीने लाँच केलं नवं फीचर्स

बिझनेसनामा ऑनलाईन । इन्कम टॅक्स भरण्याची यावर्षीची तारीख ही 31 जुलै आहे. त्यामुळे टॅक्सपेयर्स त्या तयारीला लागलेत. ऑनलाईन पद्धतीने इन्कम टॅक्स रिटर्न भरता येतो हे आपल्याला माहित आहेच परंतु आता डिजिटल पेमेंट्स आणि फिनटेक प्लॅटफॉर्म Phonepe वरून सुद्धा तुम्ही तुमचा ITR भरू शकता. कंपनीकडून याबाबत एक निवेदन जारी करण्यात आलं आहे. त्यामुळे जर तुम्ही आयटी रिटर्न भरलेला नसेल तर घरी बसल्या काही मिनिटांच्या आत ऑनलाइन पद्धतीने हा टॅक्स भरू शकतात.

फोनपे मध्ये एक फीचर जोडण्यात आले आहे. PhonePe ने PayMate या डिजिटल B2B पेमेंट सर्विस प्रोव्हायडर सोबत पार्टनरशिप केली आहे. त्यामुळे फोन पे ने ग्राहक आणि युजर साठी आयकर भरण्याची सुविधा उपलब्ध करून दिली आहे. यामध्ये वैयक्तिक आयकर, व्यावसायिक, सेल्फ असेसमेंट नंतर आयकर टॅक्स आणि ऍडव्हान्स टॅक्स UPI किंवा क्रेडिट कार्डद्वारे भरू शकतात. त्याचबरोबर आयटी रिटर्न भरणाऱ्यांना ॲडव्हान्स टॅक्स भरण्यासाठी आयकर पोर्टलची जोडण्याची देखील गरज नाही.

कंपनीने एका निवेदनात म्हटले आहे की, आयकर भरणारा व्यक्ती अँप च्या माध्यमातून लॉगिन करून आयटी रिटर्न चा विभाग निवडू शकतात. त्यानंतर फॉर्म भरून त्यांचा टॅक्स प्रकार, मूल्यांकन वर्ष, पॅन नंबर हे सर्व भरावे लागेल. नंतर टॅक्स भरल्याच्या एका दिवसात आयकर भरणाऱ्या व्यक्तीला युनिक ट्रांजेक्शन नंबर मिळेल. त्यानंतर ही रक्कम दोन दिवसानंतर टॅक्स पोर्टलवर टाकली जाईल.

फोन पे या ॲपच्या बिल पेमेंट आणि रिचार्ज बिजनेस च्या प्रमुख निहारिका सेकल म्हणाल्या की, कर भरणे ही नेहमीच जटील प्रक्रिया आहे त्यामुळे आपल्या यूजर्सना त्यांचा कर दायित्वाची पूर्तता करण्यासाठी एक अखंड मार्ग प्रदान करत आहे. कंपनीचा दावा आहे की, फोनपे ने आणलेल्या या नवीन फीचर्स नंतर आता युजर्स ला टॅक्स पोर्टलवर लॉगिन करण्याची गरज भासणार नाही.

दरम्यान, देशाच्या वित्त मंत्री निर्मला सीतारामन यांनी सोमवारी सांगितलं की, 2022 23 या आर्थिक वर्षांमध्ये इन्कम टॅक्स भरणाऱ्यांची संख्या 6.18% वाढली असून आता ही संख्या 7.40 करोड झाली आहे. त्याचबरोबर या वर्षांमध्ये भारताचा ग्रॉस डायरेक्टर टॅक्स 20.33 टक्क्यांनी वाढून 19.68 लाख करोड रुपये झाला आहे.