PhonePe Loans : PhonePe वरून घरबसल्या मिळणार कर्ज; कंपनी आणतेय नवं फीचर्स

PhonePe Loans: आपल्यापैकी अनेक जणांनी आता हातात पैसे घेऊन फिरणं जवळपास बंदच करून टाकलंय करण होणाऱ्या तांत्रिकी बदलांमुळे त्याची फारशी गरज राहिलेली नाही. कोपऱ्या कोपऱ्यात असलेल्या दुकानदारांपासून प्रत्येक रिक्षाचालकाकडे ऑनलाइन पेमेंटची सुविधा उपलब्ध असल्यामुळे हातात पैशांचे रक्कम घेऊन जाण्याची गरज आता उरलेली नाही. याच ऑनलाइन पेमेंटमध्ये कार्यरत असणारी एक सुप्रसिद्ध कंपनी म्हणजेच PhonePe . डिजिटल पेमेंटचा वापर करून अनेक लोकं दिवसाला मोठ्या प्रमाणात आर्थिक व्यवहार करत असतात. त्यामुळे आजची हि बातमी खास महत्वाची आहे. PhonePe कंपनीकडून ग्राहकांसाठी एक आनंदाची बातमी समोर आली आहे. PhonePe त्यांच्या ग्राहकांसाठी पर्सनल लोनची सुविधा उपलब्ध करून देणार आहे जाणून घेऊया याबद्दल सार काही….

PhonePe घेऊन येतेय पर्सनल लोनची सुविधा: PhonePe Loans

देशात जवळपास सगळीकडेच डिजिटल पेमेंटसाठी प्रसिद्ध असलेली कंपनी म्हणजे PhonePe . तुम्हाला माहिती आहे का PhonePe चा वापर करून आता फक्त पैशांची देवाण-घेवाणच नाही तर पर्सनल लोन मिळवणं सुद्धा शक्य होणार आहे. विशेष म्हजे यासाठी कुठल्याही बँकेत जाण्याची गरज नाही, तर घर बसल्या PhonePe या ॲपचा वापर करून तुम्ही कर्ज मिळवू शकता. सध्या कंपनी जानेवारी 2024 पर्यंत आपल्या ग्राहकांसाठी पर्सनल लोनच्या सुविधा उपलब्ध करून देण्याची योजना तयार करत आहे. इकॉनॉमिक टाइम्सने दिलेल्या माहितीनुसार पाच बँका आणि NBFC यांनी PhonePe सोबत या संदर्भात (PhonePe Loans) हात मिळवणी करण्याचा निर्णय घेतला आहे.

ग्राहकांच्या मदतीसाठी PhonePe चे प्रयत्न:

माध्यमांना मिळालेल्या माहितीनुसार कंपनी लवकरच या नवीन सुविधेबाबत अधिकृत घोषणा करणार आहे. सध्या PhonePe हि कंपनी बाजारात ग्राहकांना नेमक्या कोणत्या प्रकारच्या लोनची सर्वात जास्त गरज आहे याचा शोध घेत असून लवकरच पात्र असलेल्या लोकांना ती ऑफर्स पाठवायला सुरुवात करेल. याआधी देखील कंपनीने एक महत्त्वाचं पाऊल उचललं होतं, ज्याअंतर्गत कंपनी आपल्या ग्राहकांना विमा सेवा उपलब्ध करून देते. PhonePayच्या विमा सेवेमध्ये जीवन, आरोग्य, मोटार आणि कार विमा यांच्या सुविधा उपलब्ध आहेत. या विमा सेवेसाठी कंपनी आणि ACKO कंपनी यांमध्ये करार झालेला आहे,तुम्ही टीव्हीवर ही जाहिरात नक्कीच पाहिलेली असेल. EMIद्वारे या विमा सेवांचा फायदा करून घेता येतो. कंपनीकडून आलेल्या माहितीनुसार त्यांनी जुलै महिन्यापर्यंत 56 लाख पॉलिसी आपल्या ग्राहकांना विकल्या आहेत. पर्सनल लोनच्या सुविधा उपलब्ध करून देण्यासोबतच येणाऱ्या काही काळात कंपनी आपल्या ग्राहकांसाठी क्रेडिट कार्डची सेवा सुद्धा तयार करण्याच्या विचारात दिसते.