PhonePe वरून दिवसाला किती रुपये पाठवू शकता? काय आहे Tranjaction लिमिट?

बिझनेसनामा ऑनलाईन। आपल्याला कोरोना महामारीच्या काळात ऑनलाईन पद्धतीने पेमेंट करण्याची सवय लागली. तेव्हापासून आतापर्यंत ऑनलाईन व्यवहारात मोठी वाढ झाली आहे. सध्या स्मार्टफोनचं जग असून डिजिटल बँकिंग मुळे आपण छोट्या मोठ्या वापरातल्या गोष्टी घेण्यासाठी ऑनलाईन पेमेंट करणे योग्य समजतो. त्यानुसार आपण वापरत असलेल्या गुगल पे, फोन पे, UPI, पेटीएम यासारख्या अँप वरून आपण ट्रांजेक्शन करत असतो. आता यापैकी एका अँप ने त्यांच्या वापरकर्त्यासाठी काही नियम अटी लावल्या आहे.

दिवसातुन 20 ट्रांजेक्शनची मर्यादा –

आपण सर्वजण PhonePe अँप वापरतो. या फोनपे अँपवर आता सेक्युरिटीच्या कारणाने आरबीआय ने फोनपे ट्रांजेक्शनवर निर्बंध लावले आहे. त्यानुसार आपण दिवसाला फक्त 20 ट्रांजेक्शन करू शकतो. एवढंच नाही तर एका दिवसात आता 1 लाख पर्यंत पेमेंट होऊ शकते. म्हणजेच आपण जर कार घेण्याचा विचार करत असाल, आणि त्यासाठी ऑनलाईन पैसे पाठवणार असाल तर तुम्ही एका दिवसाला फक्त 1 लाख रुपये पाठवू शकाल. यानंतर तुम्हाला दिवसभर पेमेंट करता येणार नाही.

रिजर्व बँक ऑफ इंडियाने PhonePe ट्रांजेक्शन साठी घेतलेला निर्णय हा फोनपे च्या माध्यमातून मोठी रक्कम पाठवणारे आणि सतत कोणाला ना कोणाला ट्रांजेक्शन करणाऱ्यांसाठी आहे. PhonePe ने या नवीन नियमाबद्दल ची माहिती त्याच्या अधिकृत वेबसाईट वर दिलेली आहे. त्यामुळे तुम्हालाही याबाबत माहिती असं आवश्यक आहे.