Pick MY Work : काही दिवसांपूर्वी गिग वर्कर्स (Gig Workers) हा शब्द आपल्यासाठी पूर्णपणे नवीन होता. मात्र आता याच गिग वर्कर्सची संख्या देशभरात जोमाने वाढत आहे. गिव्ह वर्किंग मध्ये कोणाचा समावेश होतो? तर कॅब ड्रायव्हर, डिलिव्हरी बॉय जे केवळ काही दिवसांसाठीच एखादी नोकरी स्वीकारतात. सध्या आपल्या आजूबाजूची परिस्थिती पाहिली तर या कामांना तेजी येत असलेली पाहायला मिळते. शहरी भागांमध्ये तर डिलिव्हरी बॉई शिवाय जगणे शक्यच नाही. देशात काही लोकं अशीही आहेत जी अभ्यास पूर्ण करण्यासाठी राहिलेल्या वेळात गिग वर्किंग सारखी काम करतात. आणि आज गिग वर्किंगच्या समूहाला एकत्र आणून आपल्या देशात एक भानन्ट असा व्यवसाय सुरु करण्यात आला आहे. दोन अनोख्या व्यक्तींच्या कल्पनेतून घडलेला हा स्टार्ट अप जवळपास तीन लाखांपेक्षा अधिक लोकांना रोजगाराचे संधी मिळवून देत आहे. दिल्ली युनिव्हर्सिटी मध्ये फॅकल्टी ऑफ मॅनेजमेंट स्टडीजच्या शिक्षिका काजल मलिक आणि त्यांचे विद्यार्थी बंदी रेड्डी यांनी हा व्यवसाय सुरू केला आहे. देशात बेरोजगारीचे प्रमाण दिवसेंदिवस वाढत असताना अशा प्रकारचे व्यवसाय अनेकांना पैसे कमावण्याची संधी उपलब्ध करून देत आहेत.
कशी झाली Pick My Work ची सुरुवात?
काजल मलिक आणि त्यांच्या विद्यार्थी यांनी वर्ष 2017 मध्ये पीक माय वर्क (Pick My Work) नावाच्या स्टार्टअपची सुरुवात केली होती. त्यांनी बहुराष्ट्रीय आणि राष्ट्रीय स्तरावरील कंपन्यांना अत्यंत कमी ग्राहक संपादन खर्चावर (CAC) ग्राहक मिळवून देण्यास सुरुवात केली. हा स्टार्टअप येण्यापूर्वी मोठ्या कंपन्यांना ग्राहक वाढवण्यासाठी कायमस्वरूपी कर्मचाऱ्यांची नियुक्ती करावी लागत होती आणि त्यांचा पगार देखील जास्त होता. परिणामी कंपनीचा खर्च वाढायचा. Pick My Work अस्तित्वात आल्यानंतर या मोठाल्या कंपन्यांचा खर्च कमी झाला आहे, त्याचबरोबर स्टार्टअप्सचा आवाकाही वाढलाय. सध्या Pick My Work ही कंपनी देश-विदेशातील अनेक डिजिटल कंपन्यांना ग्राहक मिळवून देण्याचे काम करते. आज या कंपनीचे नाव 120 पेक्षा जास्त शहरांमध्ये पोहोचलेले आहे. तसेच कंपनी सोबत तीन लाखांपेक्षा अधिक गिग वर्कर्स समावेश होतो.
या अनोख्या व्यवसायाची प्रेरणा कुठून मिळाली?(Pick MY Work)
काजल आणि तिच्या विद्यार्थ्याला या अनोख्या व्यवसायाची प्रेरणा नेमकी कुठून मिळाली? असला प्रश्न केला असता ते म्हणतात की कॉलेजमध्ये प्लेसमेंट विभाग असायचा आणि यावेळी विद्यार्थ्यांची प्लेसमेंट मॅनेज करण्यासाठी कुठलीही टेक्नॉलॉजी उपलब्ध नव्हती. इथूनच त्यांना एक नवीन सॉफ्टवेअर तयार करण्याची कंपनी कल्पना सुचली आणि हळूहळू याच सॉफ्टवेअरशी IIM आणि IIT यांसारख्या मोठ्या संस्थांनी संपर्क करायला सुरुवात केला.
देशात काही जागा अश्या आहेत जिथे क्वचितच प्लेसमेंटच्या कंपन्या भेट देतात, त्यामुळे या मागासलेल्या ठिकाणी राहणाऱ्या विद्यार्थ्यांना कधीच नोकरीच्या संधी उपलब्ध होत नाहीत. खेड्यापाड्यातील विद्यार्थ्यांसाठी रोजगाराच्या संधी उपलब्ध व्हाव्यात म्हणून Pick My Workची सुरुवात करण्यात आली. सध्या ही कंपनी देशभरातील अनेक मागासलेल्या भागांमधील विद्यार्थ्यांना रोजगाराची संधी मिळवून देत आहे, ज्यामधून कंपनी आणि विद्यार्थी दोघांचाही फायदा होतोय.