बिझनेसनामा ऑनलाईन । सध्या ऑनलाईन बँकिंगचे जग सुरू असून प्रत्येक घरातील व्यक्तींचे बँकेमध्ये अकाउंट आहे. त्याचबरोबर मोदी सरकार आल्यानंतर जनधन योजना, (PM Jan Dhan Yojana) किसान पीएम योजना अशा बऱ्याच योजनेसाठी नागरिकांकडून बँक अकाउंट बनवून घेण्यात आले आहेत. त्यामुळे देशात 95 टक्के ग्राहकांकडे स्वतःचे बँक अकाउंट आहे. मोदी सरकारने आत्तापर्यंत देशातील गरिबांसाठी ज्या काही योजना राबवल्या त्यामध्ये प्रधानमंत्री जन धन खाते योजनेचं नाव सुद्धा आवर्जून घ्यावं लागेल. समाजातील सर्व प्रकारच्या घटकांना बँकिंग व्यवस्थेसोबत जोडण्यासाठी सरकारकडून ही योजना राबवण्यात आली आहे. या जनधन योजनेला आता 9 वर्ष पूर्ण झाले आहेत. जनधन योजनेचे मुख्य कारण म्हणजे गरिबांना आणि बँकिंग सेवांपासून दूर असलेल्या घटकांना बँकिंग सेवांशी जोडणे. सरकारने आता 9 वर्ष पूर्ण झाल्यावर जनधन खातेधारकांचीची संख्या जाहीर केली आहे.
एवढा आहे जनधन खातेधारकांचा आकडा– (PM Jan Dhan Yojana)
सरकारने दिलेल्या माहितीनुसार, जनधन खातेधारकांचा आकडा हा 50 करोड पेक्षा जास्त असून या जनधन खात्यांमध्ये मध्ये 2.03 लाख करोड रुपये एवढी रक्कम जमा आहे. समोर आलेल्या माहितीनुसार, विशेष बाब म्हणजे या खातेधारकांमध्ये पुरुषांपेक्षा महिला खातेधारकांची संख्या अधिक आहे. 56 टक्के खातेधारक या महिला आहेत. याचबरोबर अजून एक आकडा समोर आला आहे तो म्हणजे 50 करोड जनधन खात्यांपैकी 67 टक्के खाते हे खेडेगावात आणि छोट्या वस्त्यांमधले आहेत. या माहितीच्या आधारे जनधन योजना ही खेड्यांपर्यंत, छोट्या वस्त्यांपर्यंत पोहचलेली आहे हे स्पष्ट आहे.
जनधन खातेधारकांना मिळतात या सुविधा
प्रधानमंत्री जनधन योजना खात्यामध्ये (PM Jan Dhan Yojana) सरासरी रक्कम 4076 एवढी आहे. 5.5 करोड पेक्षा जास्त अकाउंट होल्डर्सला डीबीटी म्हणजेच डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफरच्या माध्यमातून या योजनेचा लाभ मिळत आहे. एवढेच नाही तर या सोबतच अकाउंट होल्डर्सला वेगवेगळ्या प्रकारचे बेनिफिट देखील मिळत आहे. जनधन योजनेमध्ये खात असलेल्यांना अकाउंट मध्ये मिनिमम बॅलन्स ठेवण्याची गरज नाही. यासोबतच फ्री रुपे डेबिट कार्ड, अपघाती विमा आणि ओवर ड्राफ्ट सुविधांचा देखील यामध्ये समावेश आहे. जनधन योजनेतील खातेधारकांना २ लाख रुपयांचा अपघाती विमा दिला जातो. या सोबतच १० हजार रुपयांपर्यंत ओव्हर ड्राफ्ट देखील दिला जातो.
जनधन योजनेत 10.79 लाख डुप्लिकेट खाते
दरम्यान, देशाची आर्थिक परिस्थिती सुधारण्यासाठी प्रधानमंत्री जनधन योजना ही अत्यंत लाभदायक आहे. या योजनेमुळे बऱ्याच जणांचे बँकेत खाते उघडले गेले आहेत. मागच्या वर्षी राज्यसभेमध्ये वित्त राज्यमंत्री भागवत कराड यांनी लेखी उत्तरांमध्ये म्हटले होते की, 30 नोव्हेंबर पर्यंत देशांमध्ये सुमारे 47.97 कोटी जनधन अकाउंट उघडले गेले आहे. यापैकी 38.19 कोटी खाते हे सुरू आहेत. तर 10.79 लाख डुप्लिकेट खाते आहेत. म्हणजे चुकीच्या पद्धतीने ही खाते उघडण्यात आली आहेत. चुकीच्या पद्धतीने खाते उघडणाऱ्यांवर कारवाई होऊ शकते. अशा परिस्थितीमध्ये हे डुबलीकेट खाती लगेच बंद करणे गरजेचे आहे.