PM Jeevan Jyoti Bima Yojana | भारतातील जास्तीत जास्त जनता ही मध्यमवर्गीय आहे. त्यामुळे केंद्र सरकार द्वारे अनेक योजना राबवत त्यांना आर्थिक मदत केली जाते. काही योजना ह्या महिलावर्गासाठी असतात तर काही बालकल्याणासाठी राबवल्या जातात. कधी मुलांना शिक्षण घेता यावं म्हणून तर कधी लग्न कार्यासाठी उपयोगी पडण्यासाठी अशा योजनांची आखणी केली जाते. आज आपण अश्या एका योजनेबद्ल जाणून घेऊया जी आपल्या देशवासियांना आर्थिक रित्या सक्षम बनव्यासाठी सरकार कडून राबवली जात आहे. या योजनेचं नाव आहे प्रधानमंत्री जीवन ज्योती बिमा योजना (PM Jeevan Jyoti Bima Yojana). ही बिमा योजना नेमकी आहे तरी की आणि यातून आपणास कसा लाभ होईल हे आपण जाणून घेऊयात.
काय आहे प्रधानमंत्री जीवन ज्योती बिमा योजना ?
जीवन ज्योती योजनेची वर्ष 2015 मध्ये झाली या योजनेचा मूळ उद्देश देशातील नागरिकांना आर्थिक द्दृश्या सक्षम बनवणे असा आहे. इथे कमीत कमी रकमेवर तुम्हाला विमा दिला जातो. केवळ 436 रुपयांच्या गुंतवणुकीवर तुम्ही तब्बद्ल 2 लाख रुपयां पर्यंत बिमा मिळवू शकता. ही policy विकत घेण्यासाठी तुम्हाला आधार कार्ड, पेन कार्ड,पासपोर्ट साईझ फोटो आणि मोबाईल नंबरची गरज असते.
ही योजना कशी काम करते? PM Jeevan Jyoti Bima Yojana
जीवन ज्योती योजनेमध्ये वय वर्ष 18 ते 50 मधली कोणतही मंडळी गुंतवणूक करू शकतात. व या Policy ची Maturity वयाच्या ५५ व्या वर्षी होते. ही Policy विकत घेण्यासाठी तुम्हाला दरवर्षी 436 रुपये भरावे लागतात. आधी हीच रक्कम २२० रुपये होती, जी वर्ष 2022 नंतर वाढवण्यात आली. या Policy चा Premium 30 मे ते 1 जून पर्यंत ग्राह्य धरला जातो. ही Policy विकत घेण्यासाठी तुम्ही जवळच्या कुठलाही Bank ची मदत घेऊया शकता किवा Online Banking सेवेचा उपयोग केला जाऊ शकतो. ह्या Policy मध्ये Term Plan मात्र दरवर्षी Renew करावा लागतो, कुठल्या एका वर्षी Premium न भरल्यास तुमची Policy ताबडतोब बंद होईल.
जीवन ज्योती योजनेचे इतर फायदे कोणते?
Policy धारकाचा जर का काही कारणामुळे मृत्यू झाला तर वारस म्हणून नाव असलेल्या व्यक्तीला insurance च्या २ लाखांची रक्कम दिली जाईल. प्रधानमंत्री जीवन ज्योती योजना (PM Jeevan Jyoti Bima Yojana) हा एक टर्म लाईफ इन्शोरन्स (Short Term Life Insurance) आहे. यायचाच अर्थ असा कि Policy धारकाचा मृत्यू झाल्यास बिमा कंपनी पैश्यांची गुंतवणूक करील, तर लवकरात लवकर ही policy विकत घ्या आणि आपलं जीवन सुरक्षित बनवा.