PM Kisan 15th Installment : तुम्हाला अजूनही मिळाला नाही 15 वा हप्ता? घाबरू नका, इथून माहिती मिळवा

PM Kisan 15th Installment : देशभरातील शेतकरी वर्गासाठी ठरलेली आनंदाची बातमी म्हणजे प्रधानमंत्री किसान योजनेचा पंधरावा हप्त्याची रक्कम. काही दिवसांपूर्वी आपण हि बातमी वाचली असेल कि देशभरातील शेतकऱ्यांना दिवाळीच्या दिवसांमध्ये एक आनंदाची बातमी मिळणार होती आणि ती म्हणजे किसान योजने अनातर्गत मिळणारी पंधराव्या हप्त्याची रक्कम… 15 नोव्हेंबर रोजी देशातील 8 कोटी लाभार्थी शेतकऱ्यांच्या खात्यात हि रक्कम समाविष्ट करण्यात आली आहे, मात्र काही कारणामुळे जर का अजून तुम्हाला पैसे मिळाले नसतील तर घाबरून जाऊ नका, आम्ही तुम्हाला एक सोपी पद्धत सुचवणार आहोत जी वापरून तुम्ही याचे कारण जाणून घेऊ शकता…

अजून हप्ता जमा झाला नाही? (PM Kisan 15th Installment)

काल प्रधान मंत्री नरेंद्र मोदी यांच्याकडून DBT च्या माध्यमातून किसान योजनेचा पंधरावा हप्ता लाभार्थी आणि गरजू शेतकऱ्यांच्या खात्यात जमा करण्यात आला. देशातील शेतकरी मित्रांसाठी हि दिवाळीची पर्वणी म्हणावी लागेल. आपण एका कृषी प्रधान देशात जगतो, शेती हाच आपला प्रमुख व्यवसाय आहे. आणि प्रधानमंत्री किसान योजना हि 8 कोटी शेतकऱ्यांना मिळणारी सर्वात मोठी आर्थिक मदत आहे. पण काही कारणास्तव जर का तुमच्या खात्यात अजूनही रक्कम जमा झालेली नसेल तर चिंता करू नका. आम्ही तुम्हाला एक मार्ग सुचवणार आहोत ज्याचा वापर करून तुम्ही हि रक्कम ताबडतोब मिळवू शकता. या योजनेच्या अंतर्गत एकूण 12.54 शेतकऱ्यांची नावं सामावलेली आहेत त्यामुळे जरी रक्कम जमा झालेली नसली तरीही घाबरून जाण्याची गरज नाही 31 डिसेंबर पर्यंत कधीही हि रक्कम जमा होऊ शकते (PM Kisan 15th Installment).

रक्सकम जमा न झाल्याचे कारण जाणून घेण्यासाठी सर्वात आधी प्रधानमंत्री किसान योजनेच्या अधिकृत वेबसाईटवर जा( http://pmkisan.gov.in/) इथे एका बाजूला तुम्हाला Farmers Corner असा एक पर्याय दिसेल, त्वरित तो पर्याय निवडा आणि त्यानंतर Know Your Status पर्याय निवडल्यानंतर एक नवीन पेज तुमच्या स्क्रीनवर उघडेल. इथून महत्वाचा टप्पा सुरु होतो, कारण आता तुम्हाला रजिस्ट्रेशन नंबर समाविष्ट करायचा आहे. हा नंबर फारच महत्वाचा असतो कारण यावरूनच तुम्हाला महत्वाची सगळी माहिती मिळणार असते. नंबर समाविष्ट केल्यानंतर Get Data हा पर्याय निवडावा, इथे तुम्हाला तुमच्या खात्याबद्दल महत्वाची संपूर्ण माहिती मिळेल, जसे कि नक्की कधी आणि किती रक्कम तुमच्या खात्यात जमा झाली आहे वैगरे.

शिवाय तुम्ही खालील पर्यायांची मदत घेऊ शकता:

१) पीएम किसान टोल फ्री नंबर: 18001155266

२) पीएम किसान हेल्पलाईन नंबर: 155261

३) ई-मेल:[email protected]