PM Kisan Yojana : 2000 रुपयांचा 14 वा हप्ता कधी मिळणार? महत्त्वाची अपडेट समोर

बिझनेसनामा ऑनलाईन । देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सरकारची महत्त्वाकांक्षी योजना असलेल्या पंतप्रधान किसान सन्मान निधी योजने (PM Kisan Yojana) अंतर्गत दरवर्षी करोडो शेतकऱ्यांना 6000 रुपये देण्यात येतात. 2000 रुपयांच्या एकूण 3 हप्त्यांमध्ये हे पैसे थेट शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा होतात. त्यामुळे शेतकऱ्यांना शेतीच्या कामासाठी मोठा आर्थिक हातभार लागतो. आत्तापर्यंत पंतप्रधान किसान सन्मान निधी योजनेच्या माध्यमातून 13 हप्ते शेतकऱ्यांना मिळाले असून आता शेतकरी 14 व्या हप्त्याच्या प्रतीक्षेत आहेत. तत्पूर्वीच या 14 व्या हप्त्याबाबत महत्त्वाची माहिती समोर आली आहे.

मीडिया रिपोर्ट्सनुसार, केंद्रातील मोदी सरकार जून महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात पंतप्रधान किसान सन्मान निधी योजनेचा (PM Kisan Yojana) 14 वा हप्ता शेतकऱ्यांच्या खात्यात जमा करू शकते. मात्र, अद्यापपर्यंत सरकारकडून याबाबत कोणतीही अधिकृत घोषणा करण्यात आलेली नाही. मात्र याच महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात हे 2000 रुपये शेतकऱ्यांना मिळाले तर नक्कीच पेरणीच्या तोंडावर शेतकऱ्यांना मोठा आर्थिक आधार मिळेल. यापूर्वी 27 फेब्रुवारी 2023 रोजी मोदींनी पंतप्रधान किसान सन्मान निधी योजनेचा 13 वा हप्ता शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा केला होता. त्यावेळी सरकारने 8 कोटींहून अधिक शेतकऱ्यांच्या खात्यात पैसे टाकले होते.

तुमच्या खात्यावर 2000 रुपयांचा हप्ता जमा झाला कि नाही ते कसे तपासावे –

1) सर्वप्रथम पीएम किसानची अधिकृत वेबसाइट www.pmkisan.gov.in वर जा.
2) आता Farmers Corner वर क्लिक करा.
3) आता Beneficiary Status या ऑप्शन वर क्लिक करा.
4) आता तुमच्यासोबत एक नवीन पेज उघडेल.
5) येथे तुम्ही तुमचा आधार क्रमांक, मोबाईल क्रमांक टाका.
6) यानंतर तुम्हाला तुमच्या पीएम किसान सन्मान योजनेच्या स्टेटसची संपूर्ण माहिती मिळेल.