PM Kisan Yojana : शेतकऱ्यांची दिवाळी होणार गोड; या दिवशी मिळणार 2000 रुपये

PM Kisan Yojana : दिवाळीच्या शुभ दिवसांत शेतकऱ्यांना सुद्धा आनंदाची बातमी मिळणार आहे. केंद्र सरकारच्या प्रधानमंत्री किसान योजनेचा 15वा हप्ता कधी मिळणार याकडे शेतकरी डोळे लावून बसलेत, परंतु आता याबाबत मोठी बातमी समोर आली आहे. येत्या 15 नोव्हेंबर 2023 रोजी पंतप्रधान किसान सन्मान योजनेचा 15 वा हप्ता शेतकऱ्यांच्या बँक खात्यावर जमा होणार आहे. त्यामुळे सणासुदीच्या काळात शेतकऱ्यांना काही प्रमाणात आर्थिक दिलासा मिळणार आहे.

शेतकऱ्यांना आनंदाची बातमी: (PM Kisan Yojana)

सरकारी वृत्तानुसार 15 नोव्हेंबर 2023 रोजी सरकार प्रधानमंत्री किसान योजनेचा (PM Kisan Yojana) १५ वा हप्ता लाभार्थी शेतकऱ्यांना देण्यात येणार आहे. 8 कोटी शेतकऱ्यांना योजनेचा 15वा हप्ता DBT द्वारे थेट त्यांच्या बँक खात्यात देऊ केला जाईल. या योजनेंतर्गत देशातील शेतकऱ्यांना तीन हप्त्यांमध्ये दरवर्षी 6000 रुपये दिले जातात आणि या योजनेचा केवळ उद्देश हा शेतकऱ्यांना आर्थिक दृष्ट्या सक्षम बनवणे असा आहे. हे 6000 रूपये 2000 रुपयांच्या प्रत्येकी 3 हप्त्यात शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा होत असतात.

आता हा योजनेचा 15 वा हप्ता जाहीर झाल्याबरोबर 8 कोटी लाभार्थी शेतकऱ्यांच्या खात्यात हे पैसे जमा होतील. मात्र ज्या शेतकऱ्यांची नावं या लाभार्थी शेतकऱ्यांमध्ये आहे यांनाच हि पैश्यांची रक्कम दिली जाईल, त्यामुळे आता हि बातमी वाचल्यानंतर जर का तुम्ही अर्ज केलेला असेल तर तुमचं नाव तपासून पहा, या सोबतच अर्ज करताना जी महत्वाची माहिती तुम्ही सरकार जमा केलीत ती बरोबर आहे ना याची खात्री करून घ्या, कारण एखादी छोटीशी चूक सुद्धा तुम्हाला योजनेपासून वंचित ठेऊ शकते. प्रधानमंत्री किसान योजनेची(PM Kisan Yojana) अधिक माहिती मिळवण्यासाठी [email protected] वर ईमेल आयडीवर संपर्क साधा किंवा 155261,1800115526, 011-23381092 या क्रमांकांवर संपर्क साधू शकता.