PM Kisan Yojana : शेतकऱ्यांनो, ‘या’ दिवशी जाहीर होणार PM Kisan योजनेचा 16 वा हप्ता

PM Kisan Yojana :भारत हा कृषी प्रधान देश म्हणून जगभरात ओळखला जातो. आपल्या देशाची खरी ओळख हि कानाकोपर्यात असलेल्या शेतकरी मित्रांमुळेच आहे हि सत्य परिस्थती डावलून चालणार नाही. सरकारचा वेळोवेळी मिळालेला मदतीचा हात हा आजही या शेतकरी मित्रांना पुढे जाण्याचं बळ देतोय, त्यांच्या मदतीसाठी अनेक योजना राबवल्या जातात आणि यातीलच एक सर्वपरिचित योजना म्हणजे प्रधानमंत्री किसान योजना . गेल्या काही दिवसांपूर्वी किसान योजनेचा 15वा हप्ता शेतकऱ्यांच्या खात्यात जमा करण्यात आला होता. आता 16 वा हप्ता शेतकऱ्यांच्या बँक खात्यावर कधी जमा होईल ते आज आम्ही सांगतो.

काय आहे PM Kisan Yojana?

शेतकऱ्यांना मदत पोहोचवण्यासाठी सर्वात यशस्वी ठरलेली योजना म्हणजे PM Kisan Yojana होय, या योजनेतर्गत शेतकऱ्यांना दरवर्षाला 6000 रुपये देऊन आर्थिक मदत केली जाते. दर २००० रुपयांच्या रूपात एकूण ३ हप्त्यात ही रक्कम शेतकऱ्यांच्या बँक खात्यात जमा केली जाते. यापूर्वी २7 जुलै रोजी सरकारकडून पीएम किसान योजनेचा 14 वा हप्ता खात्यांमध्ये जमा करण्यात आला होता आणि त्यानंतर 15 नोव्हेंबर रोजी दिवाळी नंतर 15वा हप्ता शेतकऱ्यांच्या खात्यात जमा करण्यात आला. देशातील शेतकऱ्यांना आर्थिक मदत मिळावी म्हणून हि योजना सुरु केली असल्यामुळे यांची नोंदणी प्रक्रिया सुद्धा एकदम सोपी आणि घरबसल्या करता येणारी आहे, फक्त लक्ष्यात घ्या कि नोंदणीसाठी e-KYC आणि तुमच्या जमिनीची माहिती देणारी कागदपत्रे अत्यावश्यक असतात.

कधी येणार योजनेचा 16 वा हप्ता?

सध्या (PM Kisan Yojana) योजनेचा 15वा हप्ता शेतकऱ्यांच्या खात्यात जमा झालाय आणि जे लाभार्थी अजूनही याची वाट बघत आहेत त्यांनाही हळूहळू रक्कम पोहोचवली जात आहे. पण तुम्हाला माहिती आहे का या योजनेचा 16वा हप्ता कधी येणार? जसं कि या नोव्हेबर महिन्यात योजनेचा 15वा हप्ता जाहीर झाला त्या अनुषंगाने साधारणपणे फेब्रुवारी किंवा मार्च महिन्यात 16वा हप्ता जारी केला जाऊ शकतो, मात्र या संधर्भात कुठलीही अधिकृत तारीख जाहीर करण्यात आलेली नाहीये