PM Kisan Yojana : सरकार परत घेणार पैसे; या शेतकऱ्यांना बसणार झटका

PM Kisan Yojana : देशातील शेतकऱ्यांना आर्थिक लाभ व्हावा आणि शेती करत असताना त्यांना कोणतीही पैशाची अडचण येऊ नये यासाठी केंद्रातील मोदी सरकार पंतप्रधान किसान सन्मान निधी योजने अंतर्गत दरवर्षी 6000 रुपये शेतकऱ्यांच्या बँक खात्यात जमा करते. 2000 रुपयांच्या एकूण 3 हप्त्यांमध्ये हे पैसे शेतकऱ्याला मिळत असतात. देशातील 11 कोटीहून अधिक शेतकरी या योजनेचा लाभ घेत आहेत. मात्र आता हेच पैसे केंद्र सरकार परत स्वतःकडे घेणार आहे. काही दिवसांपूर्वी सरकार कडून केलेल्या ऑडीटमधून समोर आले आहे कि काही लोकं चुकीच्या पद्धतीने या योजनेचा लाभ घेत आहेत, सरकारी योजना गरजू माणसांना मदत करण्यासाठी आहेत. परंतु काहीजण पात्र नसताना सुद्धा या योजनेचा लाभ घेत आहेत अशा शेतकऱ्यांचे पैसे सरकार परत घेणार आहे.

अपात्र लोकही घेतायत लाभ- PM Kisan Yojana

पंतप्रधान किसान योजेनच्या माध्यमातून (PM Kisan Yojana) आत्तापर्यंत रेलून 14 हप्ते शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा झाले असून लाभार्थी या योजनेच्या पंधराव्या हप्त्याची वाट बघत आहेत. याच दरम्यान ही बातमी समोर आली आहे. सरकारने काही दिवसांपूर्वी केलेल्या ऑडीट मध्ये काही चुकीच्या पद्धतीने योजनेचा फायदा करवून घेणाऱ्या मंडळींची नावं समोर आली आहे. यातील अनेक लोकं सरकारी नोकरदार आहेत, तर कित्येक जण सरकारला कर देतेत, याचाच अर्थ असा कि त्यांच्याजवळ पुरेसा पैसा नक्कीच आहे आणि त्यांना अश्या योजनेची मुळातच गरज नाही. अश्या लोकांना शोधून काढण्यासाठी सरकारने एक अभियान सुरु केले आहे. देशात हे अभियान 31 मार्च 2023 पासून सुरु असून याचवेळी खरोखर गरज असलेल्या लोकांना या योजनेत समाविष्ट करण्यात आला आहे.

पैसे परत केले नाही तर?

काही लोकांनी प्रधानमंत्री किसान योजनेचा गैरमार्गाने फायदा करवून घ्यायचा प्रयत्न केला, मात्र सरकारकडून राबवलेल्या ऑडीटमध्ये अनेकांची नावं समोर आली. आता या लोकांकडून सरकार पैसे परत घेणार आहे, आणि जर का विहित मुदतीपर्यंत पैसे परत सरकार कडे जमा झाले नाहीत तर त्यांच्या विरोधात मोठी कारवाई करण्यात येईल अशी बातमी समोर आली आहे.