PM Kisan Yojana: वडील आणि मुलगा दोघेही मिळवू शकतील का PM किसान योजनेचा लाभ? पहा नियम काय सांगतो??

PM Kisan Yojana: कृषिप्रधान देश म्हणून ओळखल्या जाणाऱ्या भारतात शेतकऱ्यांना मदत पुरवण्यासाठी सरकारकडून अनेक योजना राबवल्या जातात. यांपैकी सर्वात विशेष ठरलेली योजना म्हणजेच प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजना, ज्याला सर्वसाधारणपणे PM Kisan Yojana असंही म्हटलं जातं. शेतकरी हा आजही आपला अन्नदाता असून त्यांची आर्थिक स्थिती अधिकाधिक मजबूत करण्यासाठी केंद्र सरकारने राबवलेली ही एक महत्त्वाची योजना आहे. या योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना वर्षभरात सहा हजार रुपयांचे आर्थिक मदत दिली जाते, आणि कुठल्याही प्रकारे शेतकऱ्यांचे फसवणूक होऊ नये म्हणून ही रक्कम थेट प्रत्येक शेतकऱ्याच्या बँक खात्यात जमा केली जाते. वर्षभरात या रकमेचा तीन हप्त्यांमध्ये समान वाटा केला जातो, म्हणजेच प्रत्येकी दोन हजार रुपये हे तीन समान हप्त्यांमध्ये शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवले जातात. शेतकऱ्यांसाठी नेहमीच मदतीचा हात पुढे करणाऱ्या या योजनेचा लाभ मुलगा अन वडील हे दोघेही मिळवू शकतील का? हा प्रश्न अनेकांच्या मनात असेलच, त्यामुळे याबद्दल नेमके नियम काय सांगतात हे आज जाणून घेऊया..

वडील आणि मुलगा पीएम किसान योजनेचा लाभ मिळवू शकतात का? (PM Kisan Yojana)

एकाच कुटुंबातील वडील आणि मुलगा हे दोघेही किसान योजने योजनेचे लाभार्थी होऊ शकत नाहीत. कारण एका घरातून केवळ एकाच सदस्याला प्रधानमंत्री सन्मान निधी योजनेचा लाभ मिळू शकतो. अलीकडे सरकारकडून जारी करण्यात आलेल्या माहितीनुसार अनेक लोकं किसान योजनेसाठी पात्र नसतानाही योजनेचा लाभ मिळवत होते, त्यामुळे आता तुम्हाला एक गोष्ट कायम लक्षात ठेवावी लागेल की किसान योजनेचा लाभ घ्यायचा असेल तर तुमच्या नावावर शेती योग्य जमीन असणे अत्यंत आवश्यक आहे. कोणतेही खोटे दस्तऐवज किंवा माहिती पुरवून योजनेचा लाभ मिळवता येणार नाही. त्यामुळे अश्या कुठल्याही चुकीच्या पद्धतींचा अवलंब करून सरकारच्या नजरेत येऊन स्वतःच्या नावे गुन्हा दाखल करून घेऊ नका.

आत्तापर्यंत किती जणांनी मिळवला पीएम किसान योजनेचा लाभ?

पीएम किसान योजना ही देशातील शेतकऱ्यांच्या बऱ्याच प्रकारे कामी आलेली दिसते, या योजनेतून त्यांना अधिकाधिक फायदा मिळतोय हि आनंदाची बाब आहे. देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गेल्या वर्षी 15 नोव्हेंबर रोजी किसान योजनेचा पंधरावा हप्ता (15th Installment) जारी केला होता. याचा देशातील जवळपास 8 कोटींपेक्षा अधिक शेतकऱ्यांनी लाभ मिळवला. सरकारी आकडा उलगडून पाहायचं झाल्यास आतापर्यंत सरकारने 15 हप्त्यांमध्ये 2.1 लाख कोटी रुपये जारी केले असून, याचा एकूण 11 कोटी शेतकऱ्यांना फायदा झाला आहे, त्यामुळे शेतकऱ्यांसाठी राबवलेली ही योजना एका अर्थाने यशस्वी झालेली दिसते.

सध्या देशातील शेतकरी योजनेच्या सोळाव्या हप्त्याची (16th Installment) वाट पाहत असून, लवकरच सरकार सोळावा हप्ता जारी करेल. देशातील शेतकरी आत्महत्याचे प्रमाण कमी व्हावे तसेच अधिकाधिक लोकांच्या मनात शेतीप्रती गोडी निर्माण व्हावी म्हणून अशा पारंपरिक व्यवसायांना प्रोत्साहन देणाऱ्या योजना(PM Kisan Yojana) राबवल्या जातात. तुम्हाला जर का किसान योजनेच्या संबंधित काही समस्या असतील तर याचे देखील निराकरण सरकारकडून केले जाईल. त्यासाठी तुम्ही [email protected] या ई-मेलशी संपर्क साधू शकता किंवा 155261/1800115526/011-2338 1092 यांपैकी मोबाईल नंबरशी फोन करून संपर्क केला जाऊ शकतो.