PM Modi Brics Summit : भारत लवकरच पाच ट्रिलियन डॉलरची अर्थव्यवस्था बनेल; पंतप्रधान मोदींनी व्यक्त केला विश्वास

बिझनेसनामा ऑनलाईन । पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Modi Brics Summit) सध्या दक्षिण आफ्रिकाच्या दौऱ्यावर आहे. ब्रिक्स शिखर संमेलनामध्ये सहभागी होण्यासाठी त्यांनी हा दौरा केला आहे. ब्रिक्समध्ये भारताशिवाय यजमान दक्षिण आफ्रिका, चीन, रशिया आणि ब्राझील यासारखे देश सहभागी झाले आहे. यावेळी बिझनेस फोरम लीडर्स डायलॉगला संबोधित करताना भारत लवकरच पाच ट्रिलियन अमेरिकन डॉलरची अर्थव्यवस्था बनणार आहे, असा विश्वास पंतप्रधान मोदी यांनी व्यक्त केला.

जगात भारत तेजीने वाढत असलेली प्रमुख अर्थव्यवस्था -(PM Modi Brics Summit)

दक्षिण आफ्रिका मधील जोहानिसबर्ग या ठिकाणी ब्रिज बिजनेस फोरम लीडर्स डायलॉगमध्ये बोलताना मोदी म्हणाले, सर्वात जास्त डिजिटल ट्रांजेक्शन हे भारतात झाले आहेत. जागतिक अर्थव्यवस्थेमध्ये झालेल्या उलथापालथी नंतर भारत सर्वात तेजीने वाढत असलेली प्रमुख अर्थव्यवस्था आहे. त्याचबरोबर भारत लवकरच 5 ट्रिलियन डॉलरची अर्थव्यवस्था बनेल आणि काही वर्षांमध्ये संपूर्ण जगासाठी विकासाचे इंजिन असेल असं देखील नरेंद्र मोदी यांनी सांगितलं.

उद्योगपतींना देशाच्या विकासात सहभागी होण्याचे आवाहन

या संमेलनावेळी मोदी पुढे (PM Modi Brics Summit) म्हणाले की, मिशन मोड मध्ये करण्यात आलेल्या सुधारणामुळे भारतामध्ये व्यवसाय करणे सोपे झाले आहे. तसेच UPI पेमेंट आता रस्त्यावर विक्री करणाऱ्या पासून ते शॉपिंग मॉल पर्यंत सर्वच ठिकाणी वापरण्यात येत असून भारत हे डिजिटल झाले आहे. यावेळी मोदींनी उद्योगपतींना देशाच्या विकासामध्ये सहभागी होण्याचे आवाहन देखील केले आहे. युनिफाईड पेमेंट इंटरफेस वापरण्यासाठी ब्रिजमध्ये प्रचंड क्षमता असून डिजिटल व्यवहारांच्या आघाडीवर भारत प्रगती करत आहे. त्याचबरोबर जागतिक कल्याणासाठी भारत ब्राझील, रशिया, चीन आणि ब्रिक्स हे एकत्र काम करू शकतात. यासोबतच त्यांचे ग्लोबल साउथ मध्ये देखील महत्त्वपूर्ण योगदान मिळू शकते असं मोदींनी म्हंटल.

भारतात व्यवसाय करण्यासाठी सुलभता

ब्रिक्सचे 2019 नंतरचे हे असे पहिले संमेलन (PM Modi Brics Summit) आहे ज्यामध्ये सर्व नेते स्वतःहून सहभागी झाले आहेत. मोदी म्हणाले की, भारत लवकरच फास्ट ट्रिलियन डॉलरची अर्थव्यवस्था बनवत असून भारत येणाऱ्या काही वर्षांमध्ये पूर्ण दुनियाच्या विकासाचे इंजन बनेल. गेल्या काही वर्षांमध्ये आम्ही केलेल्या मिशन आधारित सुधारणांमुळे भारतात व्यवसाय करण्यासाठी सुलभता आली आहे. यासोबतच टेक्नॉलॉजी वर आधारित उपायांसोबतच काही सुधारणांवर भर देत आलोय. सोबतच नवी दिल्लीने संरक्षण आणि अवकाश यासाठी महत्त्वाचे क्षेत्र देखील गुंतवणुकीसाठी खुली केली आहेत. भारताने आर्थिक समावेशामध्ये मोठी झेप घेतली असून याचा सर्वात जास्त फायदा ग्रामीण महिलांना होऊ शकतो. त्याचबरोबर भारत पायाभूत सुविधांमध्ये मोठ्या प्रमाणात गुंतवणूक करत आहे.