PM Modi Gift Auction : आपले पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) अनेक देशांची भेट घेत असतात, या भेटी दरम्यान ते भारताचे संबंध इतर देशांबरोबर सुधारण्याचा प्रयत्न करतात. या भेटींमध्ये पंतप्रधानांना अनेक भेटवस्तू दिल्या जातात ज्यांचा लिलाव (PM Modi Gift Auction) सध्या देशात सुरु आहे. या भेटवस्तूंमध्ये काही स्मृतीचिन्ह किंवा पेंटीग्स आहेत. तुम्हाला जर का मोदींच्या भेटवस्तूनी तुमचं घर सजवायचं असेल तर हीच ती खास संधी चालून आली आहे. विश्वास न बसण्यासारखी गोष्ट वाटत असली तरीही यात तथ्य आहे, चला तर मग जाणून घेऊया अश्या कोणत्या वस्तूंचा लिलाव सुरु आहे व आपण त्या कश्या मिळवू शकतो…
कधीपर्यंत चालणार मोदींच्या भेटवस्तूंचा लिलाव
एक नाही, दहा नाही तर तब्बल 912 भेटवस्तूंचा लिलाव देशात सुरु आहे. या सर्व भेटवस्तू पंतप्रधानाच्या असून तुम्ही नक्कीच त्या विकत घेऊ शकता. 2 ऑक्टोबरपासून या गोष्टी लिलावासाठी बाजारात उपलब्ध झाल्या आहेत, संस्कृती मंत्रालयाकडून हा लिलाव आखण्यात आला आहे. मोदींच्या वस्तूंचा हा लिलाव 31 ऑक्टोबरपर्यंत चालणार असल्याची माहिती समोर आली आहे. कदाचित तुम्हाला हे वाचून आश्चर्य वाटेल हि गोष्ट काही देशात पहिल्यांदा घडत नाही. 2019 पासून असे लिलाव सुरु आहेत, आणि लिलाव करण्याचं हे सलग पाचवं वर्ष आहे. लिलावातील भेटवस्तूंमध्ये गुजरातच्या मेढोरा सूर्य मंदिर व चित्तोडच्या विजय स्तंभाच्या प्रतिकृतींचा समावेश आहे. या व्यतिरिक्त शाल, चित्र,तालावरी, अंगवस्त्र इत्यादी गोष्टी आहेत.
या वस्तू महागड्या आहेत का? PM Modi Gift Auction
पंतप्रधानांच्या वस्तू म्हटलं कि त्या किती महाग असतील असं वाटणं अगदीच साहजिक आहे, पण घाबरू नका इथे अश्या अनेक गोष्टी आहेत ज्या केवळ 100 रुपयांमध्ये सुद्धा खरेदी केल्या जाऊ शकतात. समोर आलेल्या माहितीनुसार लिलावातील सर्वात कमी किंमत हि 100 रुपये आहे, तर सर्वात महागडी वस्तू म्हणजे पेंटर परेश मैती यांनी काढलेलं बनारसी घाटाचं चित्र आहे ज्याची किंमत 64 लाख रुपये आहे. Deaflympics मध्ये पुरुष तसेच महिला खेळाडूंच्या सह्या असलेल्या जर्सीची किंमत 5.40 लाख रुपये आहे, लिलावातील दुसरी महागडी वस्तू असं आपण याला म्हणू शकतो. तुम्हाला जर का असं वाटतंय कि पंतप्रधानांच्या वस्तू आपल्या घरात असाव्यात तर याबद्दल( PM’s Gift Auction) आणखीन चौकशी तुम्ही नक्कीच करून पहावी.
काय आहे प्रोसेस –
तुम्हाला लिलावात (PM Modi Gift Auction) सहभागी व्हायचे असेल तर https://pmmementos.gov.in/#/ यावेबसाईटला भेट द्या. या लिंकवर नोंदणी केल्यानंतर, तुम्हाला स्क्रीनवर सर्व वस्तूंचा लिलाव होताना दिसेल. तुम्ही त्यावर क्लिक केल्यावर त्याची किंमत आणि इतर माहिती दिसेल. यानंतर तुम्ही लिलावासाठी बोली लावू शकता.