PM Suryoday Yojana: 1 फेब्रुवारी 2024 रोजी निर्मला सीतारमन यांनी अंतरिम बजेटमध्ये PM सूर्योदय योजना नावाची एक महत्त्वपूर्ण सौरऊर्जा योजना जाहीर केली होती. या योजनेनुसार, घराच्या छतावर सोलर पॅनल लावणाऱ्या ग्राहकांना 300 युनिट वीज मोफत मिळेल. याचा अर्थ वार्षिक 18,000 रुपयांची बचत होईल. या योजनेला PM सूर्य घर योजना असे नाव देण्यात आले आहे. मात्र या योजनेसाठी अर्ज कसा करावा, याची प्रक्रिया काय आहे अश्या सर्व प्रकारच्या प्रश्नांची उत्तरं अनेकांच्या मनात आहेत म्हणूनच थोडक्यात महत्वाची माहिती जाणून घेण्यासाठी ही बातमी शेवटपर्यंत नक्की वाचा..
PM Suryoday Yojana चा लाभ कसा मिळवाल?
एक तर या योजनेचा लाभ भारतातील गरजू माणसांना मिळावा अशी सरकारची अपेक्षा आहे, त्यामुळे भारतीय नागरिक किंवा देशात सुरु असलेली एखादी संस्था या योजनेचा लाभ घेऊ शकते. मात्र, यासाठी तुमच्याजवळ स्वतःचे घर असणे अपेक्षित आहे, किंवा ही सुविधा व्यवसस्थित तुमच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी मजबूत घर आणि छतावर सहज सोलर पॅनल बसविता येण्याची सोय उपलबध असली पाहिजे, सोबतच सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे लाभार्थी वर्गाकडे विजेची जोडणी असणे अनिवार्य आहे.
या योजनेसाठी अर्ज करायचा असल्यास तुम्ही https://pmsuryaghar.gov.in/consumerRegistration या इंटरनेट साईटला भेट देऊ शकता(PM Suryoday Yojana). इथे तुम्हाला महत्वाची माहिती समाविष्ट करावी लागेल आणि लक्ष्यात घ्या की या ठिकाणी सबसिडी किती मिळणार हे पण तपासता येईल. असं म्हणतात की येणाऱ्या काळात भारत सरकार अधिकाधिक भारतीयांपर्यंत ही योजना पोहोचवण्याचा प्रयत्न करणार आहे, म्हणूनच येणाऱ्या काळात या योजने अंतर्गत केवळ घराच्या छतावरच नाही तर शेत, मोकळ्या जागेवर पण सोलर पॅनल लावण्याची तरतूद केली जाईल.