बिझनेसनामा ऑनलाईन । 15 ऑगस्टला स्वातंत्र्य दिनाच्या मुहूर्तावर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लाल किल्ल्यावरून भाषण दिले. या भाषणावेळी त्यांनी बऱ्याच मुद्द्यांना हात घातला. यावेळी मोदींनी पीएम विश्वकर्मा योजनेची (PM Vishwakarma Scheme) घोषणा केली होती. त्यानंतर बुधवारी लगेचच मंत्रिमंडळाने या योजनेला तात्काळ मंजुरी दिली. पीएम विश्वकर्मा योजनेसाठी अर्थसंकल्पात तब्बल 13,000 कोटी रुपयांची तरतूद केली आहे. पारंपारिक कौशल्ये असलेल्या व्यक्तींना आधार देण्यासाठी सरकारने ही योजना आणली असून त्यानुसार, बहुतांश ग्रामीण अर्थव्यवस्थेला चालना देणार्या स्थानिक कामगारांना सौम्य अटींवर कर्ज देणे हे या योजनेचे मुख्य उद्दिष्ट आहे. या योजनेअंतर्गत नेमकं कोणाला कर्ज मिळणार? किती रुपयांपर्यंत मिळणार आणि व्याजदर किती असेल याबाबत संपूर्ण माहिती आज आपण जाणून घेणार आहोत.
कोणाला कर्ज मिळणार?
पीएम विश्वकर्मा योजनेच्या (PM Vishwakarma Scheme) माध्यमातून पारंपारिक पद्धतीने जोडल्या गेलेल्या लोकांना आर्थिक मदत दिली जाईल. या योजनेच्या माध्यमातून कुंभार, लोहार, कारागीर, सोनार, खेळणी तयार करणारे, धोबी, मूर्तिकार, सुतार अशी कामे करणाऱ्या लोकांना सरकार कडून कर्ज देण्यात येणार आहे. एका कुटुंबातील एकाच व्यक्तीला हे कर्ज मिळेल. एवढेच नाही तर या योजनेत प्रगत कौशल्य प्रशिक्षणही दिले जाणार आहे.
किती कर्ज मिळणार? (PM Vishwakarma Scheme)
केंद्रीय मंत्रांकडून 13 हजार करोड रुपयांच्या विश्वकर्मा योजनेच्या माध्यमातून कारागिरांना तीन लाख रुपयांपर्यंत सवलतिच्या दरात कर्ज मिळू शकेल. हे लोन टप्प्या टप्प्यांमध्ये मिळू शकते. पहिला टप्प्यामध्ये एक लाख रुपये लोन देण्यात येईल. त्यानंतर दुसऱ्या टप्प्यात दोन लाख रुपयांपर्यंत लोन मिळेल. या कर्जावर तुम्हाला फक्त 5 टक्के व्याजदर भरावा लागणार आहे. यासोबतच आधुनिक उपकरणे घेण्यासाठी देखील 15000 रुपयांची मदत केली जाणार आहे.
पात्रता निकष:
पीएम विश्वकर्मा कौशल सन्मान योजनेसाठी पात्र होण्यासाठी अर्जदार भारतीय नागरिक असणे आवश्यक आहे.
विश्वकर्मा कौशल सन्मान योजनेचा लाभ घेण्यासाठी अर्जदार पारंपारिक कारागीर किंवा वरील दिलेल्या कॅटेगरी मधील असावा.
योजनेसाठी अर्ज करण्यासाठी वयाचे मात्र कोणतेही बंधन नाही.
योजनेचा लाभ घेण्यासाठी या अटी पूर्ण करा –
विश्वकर्मा योजनेतून मिळणाऱ्या लोनसाठी (PM Vishwakarma Scheme) काही अटी ठेवण्यात आलेली आहे. त्यानुसार जर या योजनेच्या माध्यमातून एक लाख रुपये लोन घेतल्यानंतर ते लोन वेळेत भरणाऱ्यांना पुढे चालून दोन लाख रुपयांचं लोन देखील मिळू शकतं. यासोबतच या स्कीमच्या माध्यमातून प्रशिक्षण घेणाऱ्या व्यक्तींना प्रति दिवस प्रमाणे पाचशे रुपये स्टाईफंड देण्यात येणार आहे.
30 लाख कुटुंबांना होणार लाभ –
या योजनेच्या माध्यमातून ३० लाख कुटुंबांना या योजनेचा लाभ होऊ शकतो अशी आशा आहे. केंद्रीय मंत्र्यांनी सांगितलं की या योजनेचा लाभ घेण्यासाठी गावांमध्ये असलेल्या सर्वसामान्य सेवा केंद्रांवर रजिस्ट्रेशन प्रक्रिया पूर्ण केली जाईल. या योजनेच्या माध्यमातून पूर्ण फंडिंग ही केंद्र सरकार करणार आहे. परंतु यासाठी राज्य सरकारांचे समर्थन असणे गरजेचे आहे.
अर्ज कसा करावा –
पीएम विश्वकर्मा योजनेचा लाभ घेण्यासाठी ऑनलाइन नोंदणी फॉर्म भरणे आवश्यक आहे. आत्ता फक्त या योजनेची घोषणा झाली आहे. लवकरच पीएम विश्वकर्मा योजनेसाठी ऑनलाइन अर्ज प्रक्रिया सुरु होईल. ऑनलाइन अर्ज प्रक्रिया सुरू झाल्यानंतर, आम्ही येथे तुम्हाला माहिती देऊ.
ई बस सेवेला देखील मिळाली मंजुरी
विश्वकर्मा योजनेसोबतच पीएम नरेंद्र मोदी यांनी ई बस सेवेला देखील मंजुरी दिली आहे. यासाठी 57,613 करोड रुपये खर्च करण्यात येणार असून त्यापैकी 20,000 करोड रुपये केंद्र सरकार देणार आहे. आणि बाकीची रक्कम ही राज्य सरकार उपलब्ध करेल. या योजनेला 10 वर्षांपर्यंत बस ऑपरेटर्सला सपोर्ट केलं जाईल.देशात दहा हजार नवीन इलेक्ट्रिक बस उपलब्ध करण्यात येतील. यासोबतच या ई बसची ट्रायल ही देशातील 100 शहरांमध्ये करण्यात येणार आहे. या इलेक्ट्रिक बस पीपीपी मॉडेलच्या माध्यमातून करण्यात येणार असून यासाठी बिडींग प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. याबाबत केंद्रीय मंत्री अनुराग ठाकूर यांनी माहिती दिली. बुधवारी झालेल्या केंद्रीय कॅबिनेट बैठकीमध्ये विश्वकर्मा योजनेसह इलेक्ट्रिक बस साठी देखील मंजुरी देण्यात आली.