PM Vishwakarma Yojana : सरकारच्या ‘या’ योजनेला जनतेचा मोठा प्रतिसाद; लाखो लोकांनी केले अर्ज

बिझनेसनामा ऑनलाईन । जसं कि आपल्याला माहिती आहे सरकार दरवेळी वेगवेगळ्या योजना राबवत देशवासीयांची मदत करते. यांतीलच एक म्हणजे प्रधानमंत्री विश्वकर्मा योजना (PM Vishwakarma Yojana). या योजनेच्या माध्यमातून देशभरातील कारागिरांना ३ लाखांचे कर्ज ते सुद्धा अवघ्या ५ टक्क्यांनी सरकार देत आहे. हि योजना सुरु होऊन केवळ १२ च दिवस झाले असले तरीही देशवासियांकडून या योजनेला उत्स्पुर्त प्रतिसाद मिळाला आहे. आत्तापर्यंत या योजनेसाठी 1.40 लाखांपेक्षा अधिक लोकांनी अर्ज केले आहेत. सरकारी योजना लोकांपर्यंत पोहोचतात व लोकं त्याचा फायदा करवून घेत आहेत ही आनंदाची बाब आहे. याचा अर्थ राबवलेल्या योजना गरजू लोकांपर्यंत पोहोचत आहेत, व सरकार योग्य पद्धतीने त्यांची मदत करण्यात यशस्वी ठरत आहे.

विश्वकर्मा योजनेचा मोठा फायदा : PM Vishwakarma Yojana

प्रधानमंत्री विश्वकर्मा योजनेसाठी जवळपास 1.40 लाखांपेक्षा अधिक अर्ज आले आहेत अशी माहिती केंद्रीय सूक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योग मंत्री नारायण राणे यांनी दिली आहे. त्यांनी आपल्या सोशल मिडियावरून मोदी सरकारच्या नेतृत्वाचे कौतुक केले आहे. ते म्हणतात कि केवळ दहा दिवसांत एवढा प्रतिसाद मिळणं हा प्रधानमंत्र्यांच्या दूरदृष्टीचा परिणाम आहे व हे येणारे अर्ज म्हणजे योजनेला मिळालेला प्रतिसाद आहे.

अशी आहे विश्वकर्मा योजना :

प्रधानमंत्री विश्वकर्मा योजनेअंतर्गत (PM Vishwakarma Yojana) लोकांना कौशल्य प्रशिक्षण दिले जाईल, पण तसेच प्रशिक्षणावेळी त्यांना 500 रुपयांचं मानधनही दिलं जाईल. नवीन महत्वाची साधनं विकत घेण्यासाठी सरकार तुम्हाला 15 हजार रुपयांची मदतही करेल आणि या योजनेचा भाग असेलेले लाभार्थी 3 लाख रुपयांपर्यंतच्या कोणत्याही कमी शिवाय कर्जासाठी पात्र असतील(Vishwakarma Yojana).

कोणाकोणाला मिळणार फायदा ?

सरकारने या योजनेत 18 पारंपारिक कौशल्य व्यवसायांचा समावेश केला आहे यामध्ये सुतार, होडी बनवणारे कामगार, लोहार, कुलूप बनवणारे कारागीर, सोनार, मातीची भांडी आणि इतर वस्तू बनवणारे कुंभार, शिंपी, शिल्पकार, गवंडी, माशांचे जाळे बनवणारे, टोपली/चटई/झाडू बनवणारे, खेळणी बनवणारे आणि हातोडा आणि टूलकिट अशा कारागिरांचा समावेश आहेत.

कुठे करावा अर्ज-

जर तुम्हाला प्रधानमंत्री विश्वकर्मा योजनेसाठी (PM Vishwakarma Yojana) अर्ज करायचा असेल तर त्यासाठी तुम्ही तुमच्या जवळच्या सार्वजनिक सेवा केंद्रात जाऊन अर्ज करू शकता. तसेच या योजेनबाबत अधिक माहिती जाणून घ्यायची असेल तर पीएम विश्वकर्मा योजनेच्या अधिकृत वेबसाइट pmvishwakarma.gov.in ला भेट देऊ शकता.