PM Vishwakarma Yojana : सरकार ‘या’ नागरिकांना देणार रोज 500 रुपये; 17 सप्टेंबरला मोदी लाँच करणार नवी योजना

बिझनेसनामा ऑनलाईन । जसं की आपल्याला माहिती आहे केंद्रातील मोदी सरकारकडून वेळोवेळी जनतेला मदत करण्यासाठी नवनवीन योजना राबवल्या जातात. काही योजना या विशेषकरून महिला व बाल आणि वृद्साधांसाठी असतात, तर काहींचा उद्देश जनकल्याण असतो. आज आपण अजून एका योजनेबद्दल जाणून घेऊया जी येत्या १७ संप्टेंबरला देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी लाँच करणार आहेत. पीएम विश्वकर्मा योजना ( PM Vishwakarma Yojana) असं या योजनेचे नाव असून देशातील कष्टकरी वर्गाला डोळ्यासमोर ठेऊन ही योजना सुरु करण्यात आली आहे. या योजनेच्या माध्यमातून पात्र लाभार्थ्यांना सरकार अवघ्या ५ % व्याज दराने ३ लाख रुपयांचे कर्ज देतेय. तसेच 15 हजारचं रूपे कार्ड आणि 500 रुपये प्रतिदिन स्टायपेंडसह मूलभूत कौशल्य प्रशिक्षण दिले जाईल.

काय आहे विश्वकर्मा योजना ( PM Vishwakarma Yojana)?

स्वातंत्र्यदिनादिवशी लाल महालावरून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पीएम विश्वकर्मा योजनेची घोषणा केली होती. विश्वकर्मा योजनेची ( PM Vishwakarma Yojana) सुरुवात विश्वकार्माच्या जयंती दिवशी म्हणजेच 17 सप्टेंबर पासून करण्यात येणार आहे. देशातील छोटे-मोठे उद्योग सांभाळणाऱ्या जनतेला, शिल्पकाराना, कारागिरांना या योजनेतून भरपूर लाभ होणार आहे. या योजनेचे उद्दिष्ट कुशल कारागिरांना बहुमोल आर्थिक साहाय्य करणे हेच आहे. भारतातील कलेची परंपरा कायम राहावी म्हणून या योजनेची सुरुवात करण्यात येणार आहे. मोदी सरकारने या योजनेसाठी तब्बल 13,000 कोटी रुपयांची तरतूद केली आहे.

कोणाला होणार या योजनेमुळे फायदा?

पहिल्या आर्थिक वर्षात या योजनेमधून 1200 पारंपारिक छोट्या उद्योगांना मदत पुरवण्याचं ध्येय निश्चित करण्यात आलं आहे.15 सप्टेंबर पासून अठरा प्रकारच्या पारंपारिक कारागिरी व्यवसायांना ऑनलाईन पद्धतीने अर्ज भरून या योजनेचा ( PM Vishwakarma Yojana) भाग बनवण्यात येणार आहे. देशातील विविध कामगार जसे की लोहार, कुंभार, चांभार, मूर्तिकार, खेळणी बनवणारा इत्यादी लोकांना या योजनेतून मदत केली जाणार आहे. मात्र या योजनेचा भाग बनण्यासाठी अठरापेक्षा जास्त वय असणं आवश्यक आहे.

किती रुपयांची मदत मिळणार?

आपल्या व्यवसायाची नोंदणी केल्यानंतर, पाच दिवसांचे प्रशिक्षण दिले जाईल. ज्या नंतर तुमच्या व्यवसायासाठी आवश्यक गोष्टी विकत घेण्यासाठी सरकारकडून 15 हजारचं रूपे कार्ड दिलं जाईल. तसेच नवीन व्यवसाय सुरु करणाऱ्या माणसाला गेरंटीशिवाय 5% व्याजासह एक लाख पर्यंतच कर्ज दिले जाईल. लोनची परतफेड करणाऱ्या माणसाला पंधरा दिवसाचं प्रशिक्षण देऊन पुन्हा एकदा कोणत्याही गेरंटीशिवाय दोन लाखांपर्यंत कर्ज दिलं जाईल. महत्त्वाचे म्हणजे या योजनेच्या माध्यमातून लाभार्थ्यांना रोज 500 रुपये स्टायपेंडसह मूलभूत कौशल्य प्रशिक्षण दिले जाईल. पीएम विश्वकर्मा योजनेचा उद्देश केवळ त्या गरजू माणसाचा व्यवसाय सुधारणे हाच होय.

आवश्यक कागदपत्रे-

आधार कार्ड
ओळखपत्र
पत्त्याचा पुरावा
मोबाईल नंबर
जात प्रमाणपत्र
बँक खाते पासबुक
पासपोर्ट आकाराचा फोटो