PMPML Bus Offer: आजकाल भ्रमंतीची अनेक साधने उपलब्ध असली तरीही अनेक लोकं सरकारी बस सेवेचा वापर करतात. शाळा किंवा ऑफिस मधली सहल, पर्यटन, लग्न समारंभ इत्यादी अनेक महत्त्वाच्या समारंभांसाठी आपण भाड्याने बस किंवा गाडी शोधण्याचा प्रयत्न करतो. मात्र आता पुण्यातील PMPML ने प्रवाशांची हीच गरज ओळखून नागरिकांना शैक्षणिक संस्थांना तसेच खाजगी कंपन्यांना सवलतीच्या दरात बससेवा उपलब्ध करून देण्याचा उपक्रम सुरु केला आहे. या सेवेचा वापर करून घेत तुम्ही सवलतीच्या दरात इच्छित स्थळांना भेट देऊन पर्यटन करू शकता.
AC बसेस मुळे प्रवास होतोय आरामदायी –
PMPML कडून या बससेवेमधे इलेक्ट्रिक बस देखील समाविष्ट केलेली आहे. या बसेस वातानुकूलीत असल्यामुळे आरामदायक प्रवास करणे सोपे होते. या बससेवा सवलतीच्या दरात उपलब्ध असल्यामुळे नागरिक कमीत कमी खर्चात सुखसुविधांचा लाभ घेऊ शकतात. PMPML ही सरकारी बससेवा तुम्हाला लग्न समारंभ, दवाखान्यामधून कर्मचार्यांना ने-आण करणे, शैक्षणिक संस्थांना मदत पुरवणे तसेच खासगी कंपन्यांना सेवा पुरवणे ही कामे करते. सध्या महाराष्ट्र सरकारने प्रवाशांच्या गरजा ओळखून त्यांचा प्रवास अधिक सुखकर करण्यासाठी वातानुकूलीत बससेवा सुरू केली आहे. PMPML बससेवेमुळे पुण्यातील अधिकांश मंडळींना आरामदायक प्रवास करता येतो. कमीत कमी खर्चात सुखद प्रवास या उक्तीने PMPML कडून ही सेवा (PMPML Bus Offer) पुरवली जात आहे.
PMPML देतेय 25 टक्के सवलत – PMPML Bus Offer
हिवाळ्याचा महिना म्हटले की अनेक शाळा तसेच महाविद्यालये विद्यार्थ्यांसाठी प्रेक्षणीय स्थळांवर सहलींचे आयोजन करतात. हीच गरज ओळखून महाराष्ट्र शासनाने पी. एम्. पी. ची(PMPL) ही नवीन सेवा उपलब्ध करून दिली आहे. पुणे शहरातील शाळांना अश्या शैक्षणिक सहलींसाठी पी. एम्. पी. 25 टक्के सवलतीत सेवा उपलब्ध करून देत आहे. PMPML चे व्यवस्थापकीय संचालक नितीन नार्वेकर सदर सेवांबद्दल प्रवाशांना माहिती देताना म्हणाले की -“प्रवाशांच्या सुविधेसाठी हा नवीन करार करण्यात आला आहे. शहरातील पर्यटन स्थळे पाहण्यासाठी नागरिकांनी या सेवेचा जास्तीत जास्त लाभ घ्यावा.”