PMPML Bus Service : पुणेकरांचा सर्वस्व म्हणजेच त्यांची PMPML बस. सकाळी शाळा, कॉलेज किंवा ऑफिसमध्ये जाण्यासाठी प्रवाशांची PMPML च्या दारासमोर भली मोठी रांग लागलेली पाहायला मिळते. प्रत्येक डेपो तसेच बस स्थानकावर कार्यालयीन वेळेनुसार लोक PMPML वाट पाहत उभे असलेले पाहायला मिळतात. पुणे शहरात मेट्रोच्या येण्याने पीएमपीएलची गर्दी कमी होतेय की काय अशा चर्चा ऐकू यायच्या. मात्र पुण्यात दिवसेंदिवस वाढणारी जनसंख्या लक्षात घेता मेट्रो तसेच पीएमपी बसेसनी एकत्र येऊन काम करण्याची सर्वाधिक गरज वाटते. पीएमपी चा संपूर्ण वर्षाचा व्यवहार जर आपण पाहिला तर झालेला तोटा हा एक हजार कोटी रुपयांच्या घरात जाण्याची शक्यता वर्तवली जात आहे. मात्र या पीएमपीचे एकूण उत्पन्न तरी किती आहे हे आज सविस्तर जाणून घेऊयात…
पुण्यातली PMPML का आहे संकटात (PMPML Bus Service)
पुणे शहरातील प्रसिद्ध बस सेवा म्हणजेच पुणे महानगर परिवहन मंडळाची (PMPML ) बस. दर दिवशी अनेक प्रवाशांना आसरा देणाऱ्या पीएमपीएल बसचा व्यवसाय यंदा 1000 कोटी रुपयांच्या तोट्यात जाण्याची शक्यता आहे. असे झाले तर याचा भार पुणे पिंपरी चिंचवड महापालिका तसेच पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणावर पडणार असून, त्यांनाच हि तूट भरून द्यावी लागणार आहे.
पुणे शहरासह बाजूच्या पिंपरी चिंचवड भागातही पीएमपीएल कडून बस सेवा दिली जाते व यातूनच पीएमपीएलला उत्पन्न मिळते. या बस सेवेच्या उत्पन्नाचा आकडा जरी मोठा असला तरी त्याच्या खर्चाचे प्रमाण देखील अधिकच आहे. आताच्या घडीला PMPML मध्ये एकूण 11 हजार कर्मचारी काम करत असून त्यांना सातवा वेतन आयोग लागू करण्यात आला आहे. बाजारात सध्या इंधनाचे दर हे जोमाने वाढत आहेत, आणि खाजगी ठेकेदारांच्या बस गाड्यांचे प्रमाण देखील मोठे असल्यामुळे पीएमपीला त्या बदल्यात मोठी रक्कम भाडे म्हणून द्यावी लागते. अश्या परिस्थितीत ग्रामीण भागातही सेवा पुरवणारी पीएमपी बऱ्याच मोठ्या तोट्याचा सामना करत आहे (PMPML Bus Service). येणाऱ्या काळात सहाशे कोटी उत्पन्न मिळवण्याची शक्यता असणाऱ्या पीएमपीएलला एक हजार कोटी रुपयांचा तोटा भरावा लागू शकतो.
कोरोना काळात झाले होते आर्थिक नुकसान:
आयाधी कोरोना काळात पीएमपीला सर्वाधिक नुकसान झाले होते. साधारण दोन वर्षांपर्यंत चाललेल्या या कोरोना काळात पीएमपीला प्रत्येक 639 कोटी रुपयांचा तोटा भरावा लागला होता, याच परिणामी पुणे आणि पिंपरी चिंचवड या दोन्ही महानगरपालिकांनी कठीण परिस्थितीचा सामना केला. आत्ताच्या घडीला दरमह पीएमपीला 50 कोटी रुपयांचे उत्पन्न प्राप्त होते, मात्र उत्पन्नाच्या तुलनेत खर्चाचे प्रमाण अधिक असल्यामुळे त्यांना एक हजार कोटी रुपयांचा तोटा सहन करावा लागू शकतो (PMPML Bus Service). यावर उपाय म्हणून आता उत्पन्नाचा नवीन स्त्रोत निर्माण करण्यासाठी पीएमपी प्रशासन कार्यरत आहे.