बिझनेसनामा ऑनलाईन । स्वतःचं घर असणं हे प्रत्येकाचं स्वप्न असतं. हे स्वप्न पूर्ण करण्यासाठी बँकेकडून तुम्हाला मदत दिली जाते. परंतु काही दिवसांपूर्वीच आरबीआय ने रेपो रेट वाढवल्यामुळे होम लोन घेणाऱ्यांची संख्या कमी झाली. परंतु आता पंजाब नॅशनल बँकेने ग्राहकांना एक खुशखबर दिली आहे. पंजाब नॅशनल बँक मार्केट पेक्षा कमी किंमतीत प्रॉपर्टी ऑफर करत आहे. जर तुम्ही देखील घर खरेदी करू इच्छित असाल तर तुमच्यासाठी हा खूप चांगला चान्स आहे.
या वेबसाईटला भेट द्या- (PNB)
पंजाब नॅशनल बँकेने (PNB) ऑफिशियली ट्विट करून सांगितले की, मेगा ई-लिलाव करून तुम्ही स्वतःचं घर किंवा प्रॉपर्टी घेण्यासाठी या संधीचा फायदा घेऊ शकतात. त्याचबरोबर तुम्ही आजच बोली लावून तुमची मालमत्ता मिळवू शकतात. पीएनबी रेसिडेन्शियल प्रॉपर्टी, कमर्शियल प्रॉपर्टी, इंडस्ट्रियल प्रॉपर्टी, एग्रीकल्चरल प्रॉपर्टी विकत आहे. यामध्ये 12022 घरं, 2313 दुकान, 1171 इंडस्ट्रियल प्रॉपर्टी आणि 103 ॲग्रीकल्चर लँड विक्रीसाठी उपलब्ध आहे. यासाठी तुम्हाला ऑफिशियल लिंक देखील देण्यात आलेली असून तुम्ही https:ibapi.in या वेबसाईटवर जाऊन करू शकता.
सरफेसी कायद्यांतर्गत (SARFAESI Act) लिलाव होणार-
बरेच लोक स्वतःच घर घेण्यासाठी बँकेकडून होम लोन घेत असतात. पण काही कारणामुळे ते व्याजा सहित हे लोन फेडू शकत नाही. त्यामुळे त्यांची संपूर्ण जमीन बँकेच्या ताब्यात घेतली जाते. आणि त्यानंतर बँकेकडून या जागेचा लिलाव केला जातो. आणि यातून येणारा पैसा थकबाकी म्हणून वसूल केला जातो. पंजाब नॅशनल बँकेकडून (PNB) करण्यात येणारा हा लिलाव पूर्णपणे ट्रान्सपरंट असेल. हा लिलाव मेगा ऑक्शन सरफेसी या कायद्याअंतर्गत केला जात आहे.