Post Office Investment : पोस्टाच्या ‘या’ योजनेत नवरा- बायकोला एकत्रित गुंतवणुकीची संधी; मिळेल आकर्षक रिटर्न

Post Office Investment l आजच्या जगात महागाई खूपच जोरात वाढत आहे, कमवावा तेवढा पैसा कमी पडतोय की काय अशी परिस्थिति अनेकांवर येऊन पडली आहे. भविष्याची तडजोड म्हणून आपण काही पैसे राखून ठेवण्याचा प्रयत्न करतो, अश्यावेळी काही सरकारी योजना तर कधी बँकेकडून राबवल्या जाणाऱ्या योजनांचा फायदा करून घेतला जातो. आज आम्ही तुम्हाला अश्या एका पोस्ट ऑफिसच्या योजनेबद्दल सांगणार आहोत जिथे नवरा बायको एकत्रितपणे गुंतवणूक करून आकर्षक मोबदला मिळवू शकतात.

पोस्टात गुंतवणूक ही सर्वात सुरक्षित मानली जाते. या गुंतवणुकीवर तुम्हाला चांगला मोबदला सुद्धा मिळू शकतो. महत्वाची गोष्ट म्हणजे इथे सरकारकडून सुरक्षा दिली जाते, त्यामुळे तुम्ही गुंतवलेल्या पैशाबद्दल निश्चिंत राहू शकता. त्यातच पोस्टाच्या Monthly Income Scheme मध्ये नवरा आणि बायको मिळून या गुंतवणूक करू शकतात, ज्यामुळे भरपूर आर्थिक फायदा होऊ शकतो.

Post Office Monthly Income Scheme (POMIS) नेमकी काय आहे?

या योजनेचा (Post Office Investment) वापर करून दर महिन्याला तुम्ही एका छोट्या रकमेची गुंतवणूक करू शकता. यानंतर वेळोवेळी मिळणाऱ्या व्याजासह तुम्हाला रक्कम परत केली जाते. इथे गुंतवणूक करण्यासाठी तुम्ही भारतीय नागरिक असणं महत्वाचं आहे, सोबतच तुमचं वय 18 असावं लागेल.

POMIS चे फायदे कोणते? Post Office Investment

1) एकतर ही सरकारी योजना असल्यामुळे तुमचे पैसे इथे सुरक्षित असतात.

2) कमीत कमी पाच वर्षांसाठी ही गुंतवणूक (Post Office Investment) करण्यात येते त्यामुळे पैसे परत मिळवण्यासाठी जास्ती वाट पाहण्याची गरज नसते.

3) या खात्यासाठी तुम्ही अजून एक भागीदार निवडू शकता( Joint Holders). जर पती-पत्नीने पोस्ट ऑफिसमध्ये संयुक्त खाते उघडले तर त्या खात्यात जमा झालेल्या पैशातून तुम्हाला चांगले उत्पन्न मिळू शकते.

4) इथे पैश्यांची गुंतवणूक करण फारच सोपं आहे त्यामुळे वयोवृद्ध याचा फायदा करून घेऊ शकतात.

5) खास बाब म्हणजे आर्थिक परिस्थिती बिकट असताना सुद्धा तुम्हाला दर महिन्याला पैश्याची रक्कम नक्कीच मिळेल.

Current Interest Rates:

एक वर्ष: 5.50%

दोन वर्ष : 5.50%

तीन वर्ष : 5.50%

पाच वर्ष: 7.6%

हे कागदपत्रे गुंतवणुकीसाठी महत्वाचे आहेत:

१. ओळखपत्र: आधार कार्ड, वोटिंग कार्ड, लायसन्स इत्यादी.

२. रहिवासी असण्याचा पुरावा: वीज किंवा पाणी बिल

३. पासपोर्ट आकाराचा फोटो

POMIS चा अर्ज असा करावा:

सर्वात आधी पोस्ट मध्ये तुमचं खात असणं महत्वाचं आहे. जर का हे खात नसेल तर आधी ती तजवीज करावी.

या नंतर https://www.indiapost.gov.in/VAS/DOP_PDFFiles/form/Accountopening.pdf या साईटला भेट देऊन अर्ज भरून घ्यावा.

इथे Self Attested Documents ची गरज लागेल. या नंतर 1000 रुपयांची फी आकारली जाईल व तुमचा अर्ज पूर्ण होईल.