Post Office Kisan Vikas Patra Scheme: तुम्हाला पैश्यांची बचत करायची आहे का? हो तर बचत करण्याचे अनेक पर्याय बाजारात उपलब्ध आहेत. तुम्ही ज्या बँकेचे ग्राहक आहेत तीच बँक तुम्हाला अनेकविध पर्याय समोर आणून देईल, किंवा जर का तुम्हाला सरकारी गुंतवणूका जास्ती विश्वासपात्र वाटत असतील तर पोस्ट ऑफिस योजनांमध्ये गुंतवणूक केली जाऊ शकते. तुमची गरज आणि हातात असलेल्या पैश्याच्या आधारे एखाद्या गुंतवणुकीची निवड करावी. पोस्ट ऑफिस योजना देखील इतरांप्रमाणे मोठा परतावा देऊ शकतात. आज आम्ही तुम्हाला अश्याच एक योजनेबद्दल सांगणार आहोत. हि योजना काही वर्षातच तुमचे पैसे डबल करू शकते. चला याबाबत सविस्तर जाणून घेऊया….
पोस्ट ऑफिसची किसान विकास पत्र योजना: (Post Office Kisan Vikas Patra Scheme)
तुम्ही किसान विकास पत्र योजनेबद्दल जाणून आहात का? सध्या या योजनेअंतर्गत लाभार्त्यांना मोठा परतावा दिला जातोय म्हणून तिची चर्चा सर्वत्र आहे. एक प्रकारे छोट्या गुंतवणुकीच्या योजनेमध्ये हिची गणना होते. त्यामुळे अगदी कमीत कमी पैसे हातात असतील तरीही गुंतवणुकीचे मार्ग मात्र तुमच्यासाठी कायम खुले राहतात.सरकार सध्या तरी या योजनेवर 7 टक्क्यांपेक्षा जास्त व्याज देऊ करत आहे. असं म्हणतात कि, इथे गुंतवणूक करणाऱ्या माणसाला पैसे डबल होण्याची पूर्ण खात्री असते.
प्रत्येक माणूस हा कष्टाने कमावलेल्या पैश्यांची योग्य ठिकाणी गुंतवणूक करता यावी म्हणून धडपडत असतो. तसेच महत्वाचा असतो तो मिळणार परतावा, जिथे जास्ती मोठा परतावा तिथे गुंतवणूक करण्याचा प्रयत्न सर्वाधिक केला जातो. आणि पोस्ट ऑफिसच्या योजना या साच्यात नीट बसत असल्यामुळे त्या लोकांच्या पसंतीत उतरत आहेत. किसन विकास पात्र योजने बद्दल (Post Office Kisan Vikas Patra Scheme) महत्वाचा मुद्दा म्हणजे इथे केवळ 1000 रुपयांपासून गुंतवणूक केली जाऊ शकते, तसेच त्यावर मिळणार व्याजदार 7.5 टक्के असतो.
छोटी गुंतवणूक आणि मोठा परतावा:
वरती म्हटल्याप्रमाणे या योजनेत कमीत कमी 1000 रुपयांपासून गुंतवणुकीची सुरुवात केली जाऊ शकते. आणि म्हणूनच हि योजना अनेक स्मॉल सेविंग (Small Saving) योजनांपैकी एक आहे. इथे कोणीही तुम्हाला अमुक एका रक्कमेची गुंतवणूक केलीच पाहिजे असं म्हणत दबाव टाकू शकत नाही. त्यामुळे अगदी बिनघोर तुमच्या मर्जीप्रमाणे गुंतवणूक करत तुम्ही मोठा परतावा मात्र नक्कीच मिळवू शकता.
योजनेमधून मिळणारे फायदे इथेच सीमित होत नाहीत, तर हि योजना तुम्हाला जॉईंट अकाउंट उघडण्याची सोय उपलब्ध करून देते, तसेच 1000 रुपयांच्या गुंतवणुकीनंतर 100 रुपयांची मल्टिपल इन्व्हेस्टमेंट करण्याचा मार्गही गुंतवणुकदारांना आकर्षित करतो. तुम्हाला माहिती आहे का? या योजनेत तुम्ही नॉमिनी सुद्धा घोषित करू शकता आणि 10 वर्षांवरील मुलाच्या नावे देशील KYP खातं उघडता येतं. या योजनेत (Post Office Kisan Vikas Patra Scheme) व्याजाची मोजणी कंपाऊंडिंगच्या आधारे केली जाते म्हणूनच मोठा परतावा मिळवण्यासाठी हि योजना सर्वात योग्य आहे.