बिझनेसनामा ऑनलाईन । देशातील नागरिकांना मग तो शेतकरी असो कष्टकरी असो वा नोकरदार असो…. त्याचे जीवनमान उंचावण्यासाठी आणि त्याला आर्थिक फायदा मिळावा यासाठी सरकार वेगेवेगळ्या योजना राबवत असत. आजकाल पैशाची गुंतवणूक करायची झाल्यास आपल्यापुढे अनेक पर्याय उपलब्ध आहेत परंतु आपला पैसा सुरक्षित राहावा यासाठी अनेकजण पोस्ट ऑफिस मधेच पैशाची गुंतवणूक करण्यास प्राधान्य देतात. तुम्ही सुद्धा पोस्टात गुंतवणूक करायचा विचार मनात आणत असाल तर आज आम्ही तुम्हाला अशा एका योजनेबाबत सांगणार आहोत ज्यामध्ये गुंतवणूक केल्यास लवकरच तुम्हाला दुप्पट पैसे मिळू शकतात.
किसान विकास पत्र असे या योजनेचे नाव आहे. ही योजना केंद्र सरकारद्वारे चालवली जाणारी एकरकमी ठेव योजना आहे. या योजनेत, गुंतवणूकदाराला एकाच वेळी रक्कम गुंतवून निश्चित कालावधीत दुप्पट रक्कम मिळू शकते. या योजने अंतर्गत तुम्हाला लाभ घ्यायचा असेल तर तुम्हाला कोणत्याही पोस्ट ऑफिसमध्ये जाऊन खाते उघडावे लागेल. कमीत कमी 1000 ची गुंतवणूक तुम्हाला करावी लागेल. या योजनेअंतर्गत, KVP अंतर्गत 10 वर्षांपेक्षा जास्त वयाच्या मुलांचे खाते उघडले जाऊ शकते. या योजनेच्या अंतर्गत 7.4 टक्के व्याजदराने रिटर्न मिळतोय.
115 महिन्यात पैसा डबल –
सरकारने एप्रिल 2023 मध्ये किसान विकास पत्र योजनेच्या व्याजदरात वाढ केली आहे. त्यामुळे पैसे डबल होण्याचा कालावधी कमी झाला आहे. यापूर्वी या योजनेतून पैसे दुप्पट होण्यासाठी 120 महिने लागायचे, आता मात्र 115 महिन्यांत गुंतवणूकदारांचे पैसे दुप्पट होतील. जर तुम्ही योजनेत 10 लाख रुपये गुंतवले तर 115 महिन्यांनंतर तुम्हाला मॅच्युरिटीवर 20 लाख रुपये मिळतील. या योजनेअंतर्गत सरकार चक्रवाढ व्याजदराचा लाभ देते.