Post Office ची जबरदस्त योजना; 133 रुपयांच्या गुंतवणुकीतून मिळवा 3 लाखांचा रिटर्न

बिझनेसनामा ऑनलाईन । सध्याच्या महागाईच्या काळात भविष्याच्या दृष्टीने कोणतीही आर्थिक अडचण येऊ नये यासाठी आपण कुठे तरी पैशाची गुंतवणूक करावी असा विचार आपण करतो जेणेकरून म्हातारपणी त्याचा आपल्याला फायदा होईल. परंतु सुरक्षितपणे नेमकी कुठे गुंतवणूक करावी हा प्रश्न आपल्यासमोर उभा असतो. तुम्ही सुद्धा कमीत कमी पैशाची सुरक्षित गुंतवणूक करणार असाल तर आज आम्ही तुम्हाला पोस्ट ऑफिसच्या अशाच एका योजनेबाबत सांगणार आहोत ज्यामध्ये रोज १३३ रुपयांच्या गुंतवणुकीतून तुम्ही ३ लाखांचा रिटर्न मिळवू शकता. चला याबाबत सविस्तरपणे जाणून घेऊया.

पोस्ट ऑफिसच्या या योजनेचे नाव रेकरींग डिपॉझिट स्कीम असं आहे. या स्कीम मध्ये बऱ्याच सुविधा दिल्या जातात. त्याचबरोबर या स्कीम मध्ये गुंतवणूक करण्यासाठी बऱ्याच अटी देण्यात आलेले आहे. पोस्ट ऑफिसच्या या योजनेमध्ये 10 वर्षाच्या पुढील व्यक्ती गुंतवणूक करू शकतात. यासाठी तुम्हाला जास्त पैसे खर्च करण्याची गरज नाही. त्याचबरोबर आता केंद्र सरकारने नुकतेच रेकरिंग डिपॉझिट वर व्याजदर 6.2% वरून 6.5% केला आहे. या योजनेत अकाउंट ओपन करण्यासाठी 5 वर्षे किंवा 60 महिने पैसे गुंतवणे गरजेचे आहे. यामध्ये तुम्ही जमा केलेल्या रकमेपैकी 50 टक्के रक्कम काढू शकतात. त्याचबरोबर तुम्ही एका वर्षानंतर 50% पर्यंत कर्ज देखील घेऊ शकता.

पोस्ट ऑफिसच्या रिकरिंग डिपॉझिट मध्ये 133 रुपये दररोज गुंतवले तर महिन्याला 4000 रुपये तुम्ही गुंतवू शकतात. म्हणजेच वर्षभर तुम्ही 48000 रुपये जमा होतील. आणि पाच वर्षानंतर 1,20,000 रुपये जमतील. यावर तुम्हाला 43 हजार 968 रुपये व्याज मिळू शकते. त्यानंतर मॅच्युरिटी वर 2 लाख 83 हजार 968 रुपये तुम्हाला मिळू शकतात.