Post Office Scheme: खासगी क्षेत्रातील नोकरीच्या संधी वाढल्या असल्या तरी अनेकदा निवृत्तीनंतर आर्थिक अडचणींना सामोरे जावे लागते. कारण, खासगी क्षेत्रात पेन्शनची तरतूद नसते. अशा परिस्थितीत, पोस्ट ऑफिसच्या आकर्षक व्याजदरांच्या योजना खूप उपयुक्त ठरतात आणि या योजनांचा फायदा घेऊन निवृत्तीनंतरचे आयुष्य आर्थिक निश्चिंतात जगता येते.
ही योजना देईल दाम्पत्याला लाभ: (Post Office Scheme)
या पोस्ट ऑफिसच्या मासिक बचत योजनेत पती-पत्नी मिळून दर महिना सुमारे 5000 रुपये कमवू शकतात. या योजने अंतर्गत, single म्हणजे स्वतंत्र आणि joint म्हणजे संयुक्त अशी दोन्ही प्रकारची खाती उघडता येतात. स्वतंत्र खात्यामध्ये किमान 1000 आणि जास्तीत जास्त 4.5 लाख इतकी रक्कम जमा करता येते, तर संयुक्त खात्यामध्ये ही मर्यादा 9 लाख आहे.
या नवीन योजनेतून तुम्ही सध्या 7.4 टक्के या आकर्षक वार्षिक व्याजदरावर गुंतवणूक करता येते. तुमच्या जमा रकमेवर दरवर्षी मिळणाऱ्या व्याजाच्या आधारे परतावा दिला जातो. आता यात खास गोष्ट म्हणजे, हा वार्षिक परतावा तुम्ही 12 समान हप्त्यांमध्ये तुमच्या खात्यात जमा करू शकता. त्यामुळे दर महिना तुमच्या खात्यात उत्पन्न येत राहतं, किंवा तुम्ही वार्षिक परतावा एकाच वेळी तुमच्या खात्यात जमा करून त्यावरही अतिरिक्त व्याज मिळवू शकता.
ही पोस्ट ऑफिस बचत योजना पाच वर्षांसाठी चालते(Post Office Scheme). पाच वर्षांनंतर तुम्हाला पुन्हा या योजनेत सहभागी होण्याची संधी मिळते आणि पुढील पाच वर्षे या योजनेचा लाभ मिळवता येतो त्यामुळे, ही योजना दीर्घकालीन बचत करण्यासाठी उत्तम पर्याय आहे.