Post Office Time Deposit : गुंतवणूक हा आपल्या आयुष्यातला एक महत्वाचा घटक आहे. कष्टाने कमावलेले पैसे एका सुरक्षित ठिकाणी रुजू व्हावेत म्हणून अनेक लोकं सल्लागारांची मदत घेताना दिसतात. आज आम्ही देखील एका अश्या गुंतवणूक योजनेबद्दल सांगणार आहोत जी अनेक जणांना माहितीतली आहे आणि मोठ्या प्रमाणात आपण या योजनेमध्ये गुंतवणूक देखील करत असतो. पोस्ट ऑफिस योजनेबद्दल तुम्ही ऐकून असाल किंवा कदाचित गुंतवणूक देखील केलेली असेल. पोस्ट ऑफिसच्या एका योजनेबाबत काही दिवसांपूर्वी महत्वाची बातमी फिरत होती, आज जाणून घेऊया एका नवीन योजनेबद्दल जी गुंतवणूकदारांना मोठा परतावा देण्यासाठी सज्ज आहे
पोस्ट ऑफिसची हि योजना माहिती आहे का? (Post Office Time Deposit)
आज आम्ही ज्या पोस्ट ऑफिस बचत योजनेबद्दल सांगणार आहोत तिचे नाव आहे पोस्ट ऑफिस टाइम डेपोजीट स्कीम, (Post Office Time Deposit)…. हि योजना एकूण पाच वर्षांसाठी काम करते. याच वर्षी एप्रिल 2023 मध्ये यावर दिला जाणारा व्याजदर वाढवून 7.5 टक्के करण्यात आला आहे, व्याजदर वाढल्यामुळे हि योजना गुंतवणूकदरांसाठी चांगला पर्याय बनली आहे. प्रत्येकालाच आपण कमावलेला पैसा सुरक्षित ठेवण्याची गरज वाटत असते आणि या सोबतच जर का एखादा महत्वाचा मानला जाणारा घटक असेल तर तो आहे गुंतवणुकीवर मिळणारा परतावा. आता या बचत योजनेवर मिळणारा परतावा सुद्धा वाढला असल्यामुळे सामान्य माणसांसाठी हि योजना फायदेशीर ठरत आहे, आणि दिवसेंदिवस तिची लोकप्रियता वाढत आहे.
नेमकी कशी आहे योजना?
केंद्र सरकारकडून दर तीन महिन्यांनी छोट्या गुंतवणूक योजनांमध्ये फेर बदल केले जातात. याच बदलांच्या आधारे 1 एप्रिल 2023 रोजी 7 टक्के असलेला व्याजदर वाढवून 7.5 टक्के करण्यात आला आहे. छोट्या गुंतवणूकदारांसाठी हि पर्वणीच म्हणावी लागेल. तुम्ही या योजनेत विविध काळासाठी पैसे गुंतवू शकता जसे कि एक वर्ष, दोन वर्ष, तीन वर्ष आणि पाच वर्ष. जेवढ्या काळासाठी तुम्ही गुंतवणूक करणार आहात त्यानुसार व्याजदर बदलत जातात. एका वर्षासाठी जर का तुम्ही गुंतवणुकीचा विचार करत असाल तर 6.9 टक्के व्याज दिला जातो, हीच गुंतवणूक जर का दोन किंवा तीन वर्षांसाठी असेल तर व्याजाचा आकडा वाढून 7 टक्के होतो आणि पाच वर्षांच्या गुंतवणुकीवर 7.5 टक्के व्याज दिला जातो. सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे आयकर विभाग एक्ट 1961 सेक्शन 80C च्या अंतर्गत गुंतवणूकदार इथे टॅक्स विरहित गुंतवणुकीचा लाभ घेऊ शकतात.