Poultry Business : देशात महागाईचा स्तर कमी झालाय असं आपण म्हणतोय, पण दिवसेंदिवस बाजारातली एक एक वस्तू मात्र महाग होत चालली आहे. आज सकाळीच आपण लसणाच्या वाढलेल्या किमती पहिल्या, कांदा आणि टोमॅटो तर या शर्यतीत आधीपासून सामील आहेत. एखाद्या माध्यमवर्गीय माणसाचं आयुष्य मुश्किल करून टाकणारे हे बदल खरोखरच भयंकर आहेत. मात्र आता जी बातमी आम्ही तुम्हाला देणार आहोत ती या सगळ्यापेक्षा थोडीशी वेगळी ठरेल, कारण बाजारात चिकनच्या दरांमध्ये घसरण झालेली आहे. हिवाळा म्हटलं कि तिखट चिकन मिटक्या मारत खायची रूच आल्याशिवाय राहत नाही, आणि वाढलेली मागणी पाहता चिकनच्या किमतीतही वाढ होत असते, मात्र यंदा असं चित्र दिसत नसल्यामुळे पोल्ट्री व्यवसाय करणारे शेतकरी चिंताग्रस्त झाले आहेत.
चिकनच्या किमतींमध्ये झाली घसरण –
थंडीच्या महिन्यात चिकनला सर्वाधिक मागणी असते आणि हीच मागणी पाहता त्याच्या किमतीही वाढवल्या जातात. मात्र यंदाच्या वर्षात हवामानातील बदलांमुळे चिकनची मागणी कमी आणि पुरवठा मात्र अधिक अशी परिस्थिती निर्माण झाली आहे. काही महिन्यांपूर्वी फार्मगेटचे भाव 100 रुपये प्रति किलो चिकन असे होते ज्यात आला घसरण झाल्याने नवीन किमती 60 रुपये प्रति किलो झाल्या आहेत. कमी झालेल्या किमती पाहता काही अंशी चिकनची विक्री वाढण्याची शक्याता होती मात्र अशी चिन्ह न दिसल्याने पोल्ट्रीचा व्यवसाय (Poultry Business) चालवणाऱ्या माणसांना धोका निर्माण झाला आहे.
तामिळनाडूमधल्या एका मार्केटिंग सोसायटीच्या अध्यक्षांनी दिलेल्या माहितीनुसार दरवेळी या महिन्यात उत्पादन अधिक असते आणि म्हणून आर्थिक नुकसानीचा सामना करावा लागत नाही. मात्र यंदा सबरीमाला यात्रेचा हंगाम सुरु असल्यामुळे चिकनची विक्री कमी झाली आहे. मधल्या काळात बाजारात चिकनच्या किमतींमध्ये काही प्रमाणात वाढ दिसून आली होती आणि म्हणूनच नवीन आकडा 80 रुपये प्रति किलोवर पोहोचला होता, व्यापारी आणि पोल्ट्री व्यावसायिकांना येणाऱ्या दिवसांत यात आणखीन 20 रुपयांची वाढ होईल आशा आहे.
पोल्ट्रीच्या उत्पादन खर्चात वाढ: Poultry Business
गेल्या पाच वर्षांत पोल्ट्रीच्या उत्पादन खर्चात वाढ झाली आहे. कर्नाटक राज्य गेल्या 45 दिवसांपासून पोल्ट्री उद्योगात होणाऱ्या नुकसानीचा सामना करीत आहेत आणि हा दिवसेंदिवस वाढणारा खर्च परवडणारा नाही. बाजारात अद्याप तरी मागणी कमी असल्याने उत्पादकांना नुकसानीचा सामान करावा लागतोय. केरळच्या बाजार काही महिन्यांपूर्वी चिकनचे दर 130 रुपये होते, ज्यात आता घसरण झाल्यामुळे नवीन आकडा 106-103 रुपयांवर येऊन पोहोचला आहे. उत्पादन खर्चात झालेली वाढ पाहता देशातील लहान उत्पादक चिंतेत आहेत.