Poverty In India: भारतातून गरिबी होतेय कमी; काय सांगतो अमेरिकेतून आलेला अहवाल

Poverty In India: भारताची अर्थव्यवस्था वेगाने विकसित होत अनेक मोठ्या देशांना मागे टाकत आहे आणि भारताच्या जीडीपी वाढीच्या आकडेवारीने सर्वांना आश्चर्यचकित केले आहे. दरम्यान काल अमेरिकेतून आलेली बातमी आणखी आनंददायी म्हणावी लागेल कारण अमेरिकेतील थिंक टँक ब्रुकिंग्जने आपल्या अलीकडील अहवालात म्हटले आहे की भारतातील गरीब लोकसंख्येची संख्या सतत कमी होत आहे. अहवालानुसार,जे काम पूर्वी 30 वर्षांत होणार होते ते आता 11 वर्षांत होणार आहे.

भारतातून गरिबी होतेय हद्दपार: (Poverty In India)

अमेरिकेतील थिंक टँक ‘द ब्रुकिंग्स इंस्टिट्यूट’ मधील अर्थशास्त्रज्ञांनी एका लेखात म्हटले आहे की भारताने अति गरिबीला मात दिली आहे. त्यांनी हे विधान 2022-23 मधील नुकतेच जाहीर झालेल्या उपभोग खर्चाच्या आकडेवारीवर आधारित केले.

दोन्ही अर्थशास्त्रज्ञांनी आकडेवारीचा हवाला देत म्हटले आहे की वर्ष 2011-12 नंतर वास्तविक प्रति व्यक्ती खप 2.9 टक्के प्रति वर्ष वाढला आहे. या काळात ग्रामीण वाढीचा दर 3.1 टक्के आणि शहरी वाढीचा दर 2.6 टक्के होता. याच काळात शहरी आणि ग्रामीण भागातील असमानताही अभूतपूर्वपणे कमी झाल्याचे लेखात म्हटले आहे.

भारतात गरिबी कमी होत आहे:

शहरी आणि ग्रामीण भागातील गिनी सूचकांकात लक्षणीय घट झाली. शहरी गिनी 36.7 वरून 31.9 पर्यंत तर ग्रामीण गिनी 28.7 वरून 27.0 पर्यंत घसरला आहे (Poverty In India). हे आकडे दर्शवतात की उत्पन्नाचे वितरण अधिक समान होत आहे. गरीबी रेखेखालच्या लोकांची संख्याही झपाट्याने कमी होत आहे. 2011-12 मध्ये हे प्रमाण 12.2 टक्के होते, जे 2022-23 मध्ये 2 टक्क्यांपर्यंत घसरले आहे. याचा अर्थ असा की गेल्या दशकात भारताने गरिबीच्या विरुद्ध लढ्यात मोठी प्रगती केली आहे.