PPF Scheme : मोदी सरकारने घेतलेल्या PPF, वरिष्ठ नागरिक बचत योजना व इतर पोस्ट ऑफिस योजनांमध्ये झालेल्या बद्दलच्या महत्वाच्या निर्णयाबद्दल बातमी तपासून तपासून पहिलीत का? नसेल तर आता नक्की वाचा कारण सरकार कडून या योजनांमध्ये काही बदल करण्यात आले आहेत. (Changes In PPF Scheme). अगदीच थोडक्यात सांगायचं झाल्यास केंद्र सरकारच्या नवीन नियमांनुसार ज्येष्ठ नागरिक बचत योजनेंतर्गत खाते उघडणाच्या कालावधीत बदल करण्यात आला आहे, आधी जो काळ केवळ एक महिन्याचा होता त्यात आता मुदतवाढ करण्यात आली असून नवीन कालखंड हा दोन महिन्यांचा आहे. सरकारकडून PPF योजनांमध्ये अजून कोणते महत्वाचे बदल करण्यात आले आहेत हे जाणून घेण्यासाठी नक्की वाचा..
PPF Scheme मध्ये नेमके काय बदल झाले?
केंद्र सरकारकडून जेष्ठ नागरिकांच्या PPF Scheme सेवेत काही बदल करण्यात आले आहेत, सर्वात महत्वाचा बदल म्हणजे वाढवलेला कालखंड. नवीन नियमांनुसार आता खाते उघडण्याची वेळ मर्यादा वाढवून दोन महिने करण्यात आली आहे. आता एखादी व्यक्ती तिच्या निवृत्तीच्या तारखेपासून तीन महिन्यांच्या आत ज्येष्ठ नागरिक बचत योजनेअंतर्गत आपले खाते उघडू शकते.
याशिवाय PPF योजनेत व्याजाची गणना आता बदलली आहे. तर, जर का तुम्ही 5 वर्षांसाठी PPF खाते उघडणार असाल तर बचत सुरु केलेल्या तारखेपासून चार वर्षांनी म्हणजेच मुदतीपूर्वी तुम्ही रक्कम परत मिळवलीत तर PPF वर तुम्हाला 4% दराने व्याज देऊ केले जाईल. मात्र आधी 5 वर्षांची PPF स्कीम चार वर्षांवर बंद करण्यात आल्यास तीन वर्षांच्या मुदतीवर लागू होणारा दर व्याज मोजण्यासाठी लागू केला जात असे.
सोबतच सरकारकडून वरिष्ठ नागीरिक बचत योजनेत एकूण सात बदल करण्यात आले आहेत. ज्यात सर्वात महत्वाचा बदल म्हणजे योजनेचा वाढवलेली मर्यादा आहे, अजून एक महत्वाची गोष्ट म्हणजे आता या योजनेत सरकारी कर्मचाऱ्याच्या पती किंवा पत्नीलाही गुंतवणूक करण्याची संधी उपलब्ध करून देण्यात आली आहे.