PRAN Card And PAN Card : PRAN Card आणि PAN Card मधील फरक माहितेय का? चला तर मग जाणून घेऊया

PRAN Card And PAN Card । अनेकवेळा आर्थिक व्यवहार करताना आपण गडबड करतो, का? तर कधीतरी नावं एकसारखीच असतात पण कामं मात्र वेगळी. आता PAN Card आणि PRAN Card हि नावं दिसायला आणि वाचायला जरा एकसारखीच असली तरीही त्यांची कामं मात्र वेगवेगळी आहेत. विविध प्रकारच्या आर्थिक व्यवहारांसाठी यांचा वापर केला जातो.आपली कामं जर का बिनघोर आणि कुठल्याही समस्येशिवाय व्हायला हवी असतील तर हा फरक ओळखून वागणे खूपच महत्वाचे आहे. आज जाणून घेऊया PAN आणि PRAN यांच्यात नेमका फरक काय आहे ते ….
PAN Card आणि PRAN Card यांच्यात नेमका फरक काय?

काय आहे फरक – PRAN Card And PAN Card

PAN आणि PRAN हे जरी एकसारखे वाटत असले तरीही त्यांच्यात बराच फरक आहे. त्यांची कामं फारच वेगळी आहेत. विविध प्रकारच्या आर्थिक व्यवहारांसाठी त्यांचा वापर केला जातो. PAN म्हणजे Permanent Account Number, हा एक दहा अंकांचा युनिक अकाऊट नंबर आहे. आणि PRAN म्हणजे Permeant Rertairnment Account Number आहे, हा बारा अंकी असतो.Income Tax विभागाकडून जारी केले जाणारे PAN Card हे सर्व कर भरणाऱ्या लोकांसाठी अनिवार्य आहे. तर राष्ट्रीय पेन्शन स्कीममध्ये गुंतवणूक करणार्यांसाठी PRAN Card महत्वाचं आहे.

PAN Card म्हणजे काय?

आयकर विभागाकडून जारी करण्यात आलेला हा दहा अंकी युनिक नंबर आहे. या नंबरच्या मदतीने कर भरणारी व्यक्ती आपले आर्थिक व्यवहार पूर्ण करू शकते. तसेच हा नंबर प्रत्येक कर भरणाऱ्या माणसाविषयी माहिती जपायला आयकर विभागाला मदत करतो. ITR भरणे, रिटर्नचा दावा करणे, सुधारित रिटर्न भरणे इत्यादी कामांसाठी PAN Card आवश्यक आहे. PAN कार्डचा वापर एक वैध KYC दस्तावेज म्हणून केला जातो. इथे अर्ज करण्यासाठी कार्दारांना ID Proof, पत्त्याचा पुरावा फोटो आणि जन्म तारखेचा पुरावा देणे अनिवार्य आहे. एक कर भरणारा व्यक्ती केवळ एकच PAN कार्डचा धारक असू शकतो

PRAN Card म्हणजे काय?

PRAN हा नेशनल सेक्युरिटीज डेपोजीटरी लिमिटेड (NSDL) कडून जारी केला जातो. हा बारा अंकांचा एक युनिक क्रमांक असतो. National Pension Scheme चा वापर करून पेन्शन मिळवणाऱ्या लोकांना हे कार्ड अत्यावशक आहे. PRAN गुंतवणूकदारांची माहिती NSDL पर्यंत पोहोचवण्याचे काम करतो आणि पेन्शन लाभाचा दावा करण्यासाठी मदत करतो. एखाद्या व्यक्तीकडे PRAN च्या अंतर्गत दोन प्रकारची NPS असू शकतात, ज्यात Tier-1 आणि Tier-2 यांचा समावेश होत. हे कार्ड नवीन गुंतवणूकदरांसाठी ओळख (PRAN Card And PAN Card) म्हणून काम करतो. PRAN साठी अर्ज करताना सदस्यांना रीतसर अर्ज भरून फोटो आणि KYC कागदपत्रे जोडून तो अर्ज सदर करावा लागतो, आणि एका ग्राहकाकडे केवळ एकाच PRAN Card असू शकते.