Pran Pratistha Ayodhya : आज अयोध्येत राम मंदिराच्या गर्भगृहात मूर्तीच प्राणप्रतिष्ठा झाली, मात्र मंदिर आणि मूर्ती हे केवळ श्रद्धेपुरतं मर्यादित नसून त्याचा फायदा आपल्या बाजाराला देखील होणार आहे. आजच्या प्राणप्रतिष्ठा सोहळयाला केवळ भारतच नाही तर संपूर्ण जगभरातील मंडळी उपस्थित होती आणि आता तज्ञांच्या मते मंदिर पाहण्यासाठी अनेक पर्यटक गर्दी करणार आहेत. ग्लोबल ब्रोकरेज हाऊज Jefferies ने मंदिराबद्दल एक अहवाल सादर केला असून, त्यांच्या मतानुसार आता भारतातील पर्यटन क्षेत्राला मंदिराचा भरपूर फायदा होणार आहे, म्हणूनच भक्ती आणि अर्थव्यवस्था असा हा आगळा वेगळा संगम असेल.
Jefferies ने सादर केलाय अहवाल : (Pran Pratistha Ayodhya)
Jefferies ने सादर केलेल्या अहवालत त्यांनी मंदिराबद्दल काही विशेष माहिती दिली आहे, त्यांनी दिलेल्या माहितीनुसार दरवर्षी अयोध्या जगभरातील जवळपास 5 कोटी किंवा त्यापेक्षाही अधिक लोकांना आकर्षित करणार आहे. मंदिरामुळे पर्यटन क्षेत्रच नाही तर विमान सेवा, रेल्वे, हॉस्पिटॅलिटी, सिमेंट, MFCG अश्या अनेक क्षेत्रांना नफा कमावण्याची संधी चालून आली आहे.
अयोध्येत स्थापन झालेली पाच वर्षांच्या रामाची कोवळी मूर्ती खरंतर आपल्या अर्थव्यवस्थेला बरीच मदत पोहोचवणार आहे. अहवालानुसार आता भारतात नवीन पर्यटनस्थळ सुरु झालं असून अनेकांसाठी हा आकर्षणाचा केंद्रबिंदू ठरेल, परिणामी जगभरातून पर्यटक तसेच श्रद्धाळू दर्शनासाठी आणि मंदिराची कारागिरी पाहण्यासाठी अयोध्येत रंग लावतील. सध्या 85,000 कोटी रुपये खर्च करून अयोध्या नगरीचे पुर्निर्माण करण्यात आले आहे; ज्यात विमानतळ, रेल्वे स्टेशन, रस्ते, टाऊनशिप इत्यादीनाचा समावेश होतो (Pran Pratistha Ayodhya). अहवाल असेही सांगतो की भारतीय पर्यटन विभागामध्ये अयोध्या हे केंद्र बनेल, सध्या मंदिर पूर्ण झालेलं नसताना देखील उत्सुकजनांचा आकडा 3 कोटीच्या आसपास आहे. देशात कोविडच्या काळात GDP मध्ये पर्यटनाने 194 डॉलर्सचं योगदान दिलं होतं आणि आता नवीन बदलांसहा हा आकडा 443 अरब डॉलर्सवर पोहोचण्याचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे.