Pranjali Awasthi Success Story : वयाच्या 16 व्या वर्षीच उभारली 100 कोटींची AI कंपनी; कोण आहे प्रांजली अवस्थी?

Pranjali Awasthi Success Story : भारताला जगभरात तरुणांचा देश म्हणून ओळखलं जातं. आपल्या देशात असलेली तरुणांची अधिकतम संख्या हीच आपली खरी ताकद आहे. यासोबतच भारत सध्या प्रगतीच्या मार्गावर यशस्वीपणे वाटचाल करत आहे. स्टार्ट अपच्या क्षेत्रात सुद्धा आपण कमालीची कागिरी दर्शवली आहे. देशवासियांकडून येणाऱ्या विविध कल्पनांमुळे आपल्या देशात आज अनेक व्यवसाय पाय रोवत आहेत. आज आम्ही तुम्हाला एका मुलीची गोष्ट सांगणार आहोत जिने केवळ वयाच्या 16 व्या वर्षी AI चा स्टार्ट अप सुरु केला आहे. जे वय आपण धोक्याचं असं म्हणतो त्याच कोवळ्या वयात या मुलीने सर्वांसाठी एक उदाहरण तयार केलं आहे.

कोण आहे ही मुलगी?-

या सोळा वर्षांच्या छोट्या मुलीचं नाव आहे प्रांजली अवस्थी (Pranjali Awasthi) . तिने Delv.AI नावाचा स्टार्ट अप सुरु करून सगळ्यांनाच चकित केलं आहे. तिच्या या आविष्काराचा उद्देश संशोधकांना मद्त करणे हा आहे. प्रांजालीने वर्ष 2022 मध्ये या स्टार्ट अपची सुरुवात केली होती आणि तुम्हाला वाचून आश्चर्य वाटेल,पण या चिमुकलीने आतापर्यंत 3.7 कोटी रुपयांची कमाई (Pranjali Awasthi Success Story) केली आहे. प्रांजलीच्या Delv.AI मध्ये एकूण 10 लोकं काम करतात. तिला आधीपासूनच तंत्रद्यानांची आवड होती. आणि घरून मिळालेलं वातावरण देखील या आवडीला पोषक ठरलं. प्रांजलीचे वडील हे इंजिनियर आहेत व त्यांनीच प्रांजालीच्या मनात लहापणापासून कम्प्युटरची आवड निर्माण केली होती.

वडिलांच्या मदतीने केली सुरुवात- Pranjali Awasthi Success Story

प्रांजली म्हणते कि तिच्या वडिलांच्या मदतीने तिने अवघ्या सातव्या वर्षीच कोडींग करायला सुरुवात केली होती. आज जे काही यश तिने मिळवलं आहे त्याचा पाया हेच कोडींग आहे असं तिचं म्हणणं आहे. तिच्या या आवडीला अजून एक फायदा झाला तो म्हणजे कुटुंबाने फ्लोरिडाला राहायला गेल्यामुळे. परदेशात तिला या संदर्भात अजून जास्त कला कौशल्य निर्माण करण्याच्या संधी उपलब्ध झाल्या.

वयाच्या 13 व्या वर्षीच प्रांजालीने फ्लोरिडा इंटरनेशनल युनिव्हर्सिटी मधून इंटर्नशिप करायला सुरुवात केली. या इंटर्नशिपमुले तिला मशीन लर्निंगबदल अधिक माहिती जाणून घ्यायला मदत झाली. स्वतःचा व्यवसाय सुरु करण्याची कल्पना सुचली ती सुद्धा इथूनच.आता या कोवळ्या मुलीची कामगिरी अनेकंना प्रोत्साहन देणारी आहे हे मात्र नक्की.