Pratham EPC Projects IPO: आज जाहीर झालाय ‘या’ कंपनीचा IPO; पहा गुंतवणूकदार कसा कमावतील नफा

Pratham EPC Projects IPO: कंपनी वाढण्यासाठी पैशांची गरज असते. IPO म्हणजे “Initial Public Offering”, यामध्ये कंपनी पहिल्यांदाच गुंतवणुकदारांना आपल्या मालकीचा थोडा वाटा विकून देते आणि त्या बदल्यात गुंतवणुकदार कंपनीमध्ये पैसे गुंतवतात. यामुळे कंपनीला पैसा मिळतो आणि गुंतवणुकदारांना कंपनीच्या नफ्यात वाटा मिळण्याची संधी. तुम्ही अनेक कंपन्यांचे IPO बाजारात आल्याच्या बातम्या देखील पहिल्याच असतील आणि आज देखील गुंतवणुकीच्या या हटके संधीची वाट पाहणाऱ्यांसाठी आनंदाची बातमी समोर आली आहे प्रथम ईपीसी प्रोजेक्ट्(Pratham EPC Projects) या कंपनीचा IPO आज खुला झाला असून गुंतवणूकदार 13 मार्च पर्यंत इथे बोली लावू शकतात.

या नवीन IPO ची विशेषता काय? (Pratham EPC Projects IPO)

Pratham EPC Projects IPO या कंपनीची सुरुवात वर्ष 2014 मध्ये झाली होती आणि ही कंपनी Welding, चाचणी आणि Commission Gas Pipeline प्रकल्पांची बांधणी करून व्यवसाय करते. आज समोर आलेल्या माहितीनुसार आजपासून ते 13 मार्च पर्यंत कंपनीचा IPO उघडला जाणार आहे आणि या IPOचा आकार 36 कोटी रुपये असेल. यानंतर 18 मार्च पर्यंत सदर कंपनीचे लिस्टिंग BSE SME वर केले जाईल.

गुंतवणूकदारांसाठी ही आहे विशेष माहिती:

कंपनीने 71-75 रुपये प्रति शेअरची किमतीचे बँड निश्चित केले असून यामधून 48 लाख नवीन शेअर्स जारी केले जाणार आहेत. किरकोळ गुंतवणूकदारांसाठी लाॅटचा आकार 1,600 शेअर्स असा निश्चित करण्यात आला आहे. याचा अर्थ तुम्ही 1,20,000 रुपयांपर्यंत इथे गुंतवणूक करू शकता.

कंपनीचे(Pratham EPC Projects IPO) प्रवर्तक नयनकुमार मनुभाई पानसुरिया आणि प्रतीककुमार मगनलाल वेकारिया यांच्याकडे सध्या कंपनीची 100 टक्के हिस्सेदारी आहे. IPO मधून ते 50 टक्के शेअर्स पात्र संस्थात्मक खरेदीदारांना, 35 टक्के शेअर्स किरकोळ गुंतवणूकदारांना आणि 15 टक्के शेअर्स बिगर संस्थात्मक गुंतवणूकदारांसाठी राखीव ठेवणार आहेत.