Pregnancy Expenses : गरोदरपणाचा सुंदर काळ सुरक्षित बनवा; असे करा पैश्यांचे नियोजन

बिझनेसनामा ऑनलाईन । एखाद्या स्त्रीच्या आयुष्यातील सर्वात महत्वाचा क्षण म्हणजे गरोदरपणा. आज आपण कितीही पुढारलेलो असलो तरीही प्रत्येकीला असेलेली गरोदरपणाची आणि आई बनण्याची इच्छा आजही तशीच आहे. प्रत्येकीच्या आयुषला कलाटणी देणारा हा काळ अत्यंत महत्वाचा आहे, यावेळी त्या बाईची विशेष शारीरिक आणि मानसिक काळजी घेण्याची गरज असते, अगदी बरोबर आहे, पण यासोबतच तिच्या गरोदरपणा आणि बाळंतपणाला आर्थिक आधार देणंही तेवढंच महत्वाचं आहे. घरात नवीन बाळ येणार म्हणजे एक वेगळाच उत्साह निर्माण होतो हे खरं आहेच पण या दरम्यान लागणाऱ्या पैश्यांची नीट तरतूद (Pregnancy Expenses) केलेली असायला हवी.

गरोदरपणात पैश्यांचे नियोजन हवे:(Pregnancy Expenses)

नवीन बाळाच्या भविष्याची तरतूद महत्वाची असतेच, पण त्याचबरोबर गरोदरपणा आणि बाळंतपणाच्या काळात सुद्धा पैश्यांचे योग्य नियोजन हे कधीही फायद्याचे आहे. या गोष्टीवर कदाचित आपण जास्ती जोर देऊन कधीही विचार केलेला नसतो, पण तो करावा लागेल कारण या वाढत्या महागाईत जर का कोणी सुरक्षित वाट दाखवणार असेल तर म्हणजे पैश्यांचे योग्य नियोजनाच होय.

आपण हेल्थ इन्शुरन्स बनवतो नक्कीच, पण अनेकवेळा त्यात गरोदरपण आणि बाळंतपणाचा खर्च सामावलेला नसतो. आणि अश्यावेळी मग खिश्याला कात्री लाऊन पैश्यांची जमावजमव करावी लागते. शेवटच्या वेळी पैश्यांसाठी केलेली धावाधाव हि खरोखरच डोके दुखी आहे आणि म्हणूनच जर का तुमची पत्नी गरोदर असेल आणि काही महिन्यातच तुम्ही नवीन पाहुण्याचं स्वागत करणार असाल तर वेळीच पैश्याचं नियोजन करा.

गरोदरपणात पैश्यांचं नियोजन कसं कराल?

बाळाचे स्वागत नक्कीच तुम्ही आनंदाने आणि उत्साहाने कराल, पण त्याआधी लागणाऱ्या खर्चाचे नियोजन करण्यासाठी काही महत्वाच्या गोष्टी आम्ही तुम्हाला सुचवणार आहोत (Pregnancy Expenses). सर्वात आधी हेल्थ इन्शुरन्स निवडा ज्यात गरोदरपणा आणि बाळंतपण दोन्हीचा खर्च सामावलेला असेल. तुम्हाला साधारणपणे या काळात किती पैश्यांची गरज पडू शकते याचे नियोजन करा, यासाठी नक्कीच डॉक्टर्स सोबत सल्लामसलत केली जाऊ शकते. औषधं किती प्रकारची असतात, वैद्यकीय चाचण्या किती आणि कश्या असाव्यात इत्यादी गोष्टींचा आढावा घ्या. ज्या हॉस्पिटलमध्ये तुम्ही नाव नोंदणे केलेली आहे तिथे बाळंतपणाच्या खर्चावर काही सवलती दिल्या जात आहेत का यांची चौकशी करा आणि हा आनंदाचा क्षण सुरक्षित बनवा.