President Speech Today: उद्या म्हणजेच 1 फेब्रुवारी रोजी सादर होणारं बजेट हे अंतरिम बजेट असणार आहे. अगदीच तीन महिन्यांसाठी तयार करण्यात आलेल्या या महत्वपूर्ण दस्तऐवजाकडे देशातील प्रत्येकाने नजर फिरवलीच पाहिजे. बजेट हा आपल्या आर्थिक वर्षाचा पाया असतो, संपूर्ण वर्षभरात कोणत्या मंत्रालयाला किती पैसे दिले जातील, इत्यादी सर्व गोष्टींची मांडणी बजेटमधून केली जाते. भारताचे सुजाण नागरिक म्हणून आपल्याला याची माहिती असलीच पाहिजे. आज देशाच्या राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी बजेट सत्राच्या सुरुवातीला उपस्थितांशी संवाद साधला आणि मोदी सरकारच्या अंतर्गत झालेल्या अनेक बदलांवर नजर फिरवली. चला मग आज जाणून घेऊया बजेट सत्रात नेमकं काय म्हणाल्या राष्ट्रपती.
बजेट सत्रात हे होते राष्ट्रपतींचे शब्द: (President Speech Today)
बजेट सत्राच्या सुरुवातीला देशाचे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी येणारं बजेट महिलांवर अधिक लक्ष केंद्रित करणार आहे याची ढोबळ माहिती दिली होती. त्यांनतर आज राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी सत्रात उपस्थितांशी संवाद साधला. सर्वात आधी त्यांनी गेल्या वर्षभरात भारताच्या अर्थव्यवस्थेने दाखवलेल्या मजबूत कामगिरीचे कौतुक केले. ज्या कळत संपूर्ण जग महागाईशी झुंजत होतं तेव्हा भारत मुळीच न डळमळता प्रगतीच्या मार्गावर कायम होता. गेल्या तिमाहीचा आकडा पहिला तर आपल्या देशाचा विकास दर हा 7.5 टक्के आहे.
या भाषणात त्यांनी नवीन संसद भावनाचा उल्लेख केला, जो मुद्दा सर्वात महत्वाचा आहे. नवीन संसद भवनाच्या बांधणीनंतर हे पाहिलं बजेट प्रस्तुत केलं जाणार असल्याने उद्याचा दिवस इतिहासात कायमचा करून ठेवला जाईल. नवीन संसद भवनातील आपल्या पहिल्या भाषणात त्यांनी भारत आता खऱ्या अर्थने प्रगतीच्या मार्गावर असल्याचे उद्बोधन केलं. गेल्या वर्षभरात आपण G20 सारख्या मोठमोठाल्या अभियानांचा पायंडा रोवला आहे. मुंबईमध्ये बनलेल्या अटल सेतूमुळे अनेकांना रोजगार मिळवून देण्यात सरकार यशस्वी झालंय असं त्या म्हणाल्या, एकूण वर्षात सरकारकडून राबवले गेलेले उपक्रम हे निश्चितच जनतेच्या हिताचे असल्याचे मत त्यांनी व्यक्त केले.
राम मंदिराबद्दल काय म्हणाल्या राष्ट्रपती?
गेल्या 10 वर्षांच्या कार्यकाळात मोदी सरकारने अनेक गोष्टी सध्या करून दाखवल्या आहेत. यामध्ये आर्टिकल 370 हटवण्यापासून ते राम मंदिर निर्मितीपर्यंत केलेल्या सर्व गोष्टींचा आराखडा मांडण्यात आला होता (President Speech Today). या सर्व बदलांमध्ये One Nation One Poll, गरिबीवर केलेली मात, Chief Of Defense ची नियुक्ती, 1 लाख स्टार्टअप्स, वंदे भारतची सुरुवात अश्या अनेक गोष्टी मांडण्यात आल्या होत्या.