Public Provident Fund : पोस्ट ऑफिसची जबरदस्त योजना; तुम्हीही व्हाल करोडपती

Public Provident Fund :आपण गुंतवणूक का करतो? भविष्याच्या दृष्टीने फायदा व्हावा म्हणून. आपलं भविष्य सुरक्षित असावं म्हणून. गुंतवणूक करताना हाच विचार केला जातो कि कमीत कमीत पैसे जमा करून शेवटी त्यातून मोठा फायदा कसा मिळवला जाऊ शकतो. असा गुंतवणुकीचा प्रकार असतो का? हो असतो ना, जर का तुम्ही पोस्ट ऑफिसच्या पब्लिक प्रोवीडन्ट फंडचा विचार केला. हि सरकारी योजना असल्यामुळे ती बऱ्याचप्रकारे सुरक्षित आहे. एवढाच नाही तर तर गुंतवणुकीच्या शेवटी मिळणारा रिटर्न सुद्धा भला मोठा असतो. या योजनेच्या माध्यमातून ठरविक रकमेच्या गुंतवणुकीच्या जोरावर तुम्ही फक्त १५ वर्षात करोडपती होऊ शकता. कसे ते आज आम्ही सांगतो.

PPF वरच्या गुंतवणुकीवर (Public Provident Fund) सध्या 7.1 टक्के व्याजदर दिला जात आहे. या योजनेत गुंतवणूक करण्याची सुरुवात तुम्ही केवळ 500 रुपयांपासून करू शकता, जी पुढे जाऊन एक ते दीड लाख पर्यंत सुरु ठेवता येते. या योजनेचा कालावधी पाच वर्षांसाठी आहे, पण पाच वर्षांच्या मेच्युरीटी नंतर सुद्धा तुम्ही गुंतवणूक पुढे चालू ठेऊ शकता.याचाच अर्थ असा कि सलग 15 वर्षांसाठी एखाद्या माणसाकडून या योजनेत पैसे गुंतवले जाऊ शकतात. या योजनेची मुदत 5 वर्ष असल्यामुळे मुदत संपायच्या आधी पैसे काढण्याची परवानगी नसते. आणि शेवटी पैसे काढताना देखील 2 फॉर्म भरून आणि कार्यालयीन प्रक्रिया पूर्ण केल्या नंतरच पैश्यांची रक्कम काढली जाऊ शकते. जर का 15 वर्ष पूर्ण होण्याआधीच तुम्ही रक्कम काढणार असाल तर मात्र 1% रक्कम फाईन म्हणून भरावी लागेल ( Public Provident Fund).

कसे व्हाल करोडपती – Public Provident Fund

PPF योजनेसाठी खाते उघडायचे असेल तर जवळच्या बँक किंवा पोस्ट ऑफिसला भेट द्या. हे अकाउंट तुम्ही स्वतःच्या नावाने किंवा परिवारातील इतर सदस्यांच्या नावाने उघडू शकता. पण हिंदू अविभाजित परिवाराच्या नावे हे अकाउंट उघडला जाऊ शकत नाही. जर का तुम्ही या योजनेत 15 वर्षांसाठी 12,500 पर्यंत गुंतवणूक केलीत तर 7.1% व्याजाच्या आधारे तुम्हाला मुदत संपल्यावेळी 39.82 लाख रुपये सहज मिळतील. मॅच्युरिटीनंतर, तुम्ही ते आणखी 5 वर्षांसाठी वाढवू शकता. म्हणजेच तुम्ही या योजनेत एकूण 25 वर्षांसाठी गुंतवणूक करू शकता. 25 वर्ष 7.1% वार्षिक व्याजदरावर 65.58 लाख रुपयांच्या व्याजासह एकूण 37.50 लाख रुपये जमा केल्यास, तुम्हाला मॅच्युरिटीवर 1.02 कोटी रुपये मिळतील.