Public Transport: RBI ने शुक्रवार 24 फेब्रुवारी 2024 रोजी एक महत्त्वाचा निर्णय घेतला. या निर्णयानुसार, बँका आणि नॉन-बँक संस्था RBI च्या परवानगीने विविध प्रकारचे Prepaid Payment Instruments (PPI) जारी करू शकतील, यामुळे प्रवाशांना सार्वजनिक वाहतूक प्रवासासाठी डिजिटल पेमेंटची सुविधा उपलब्ध होणार आहे.
KYC नसलेले PPI देखील जारी केले जातील: (Public Transport)
या नवीन नियमांनुसार, KYC नसलेले PPI देखील सार्वजनिक वाहतूक प्रवासासाठी जारी केले जातील, यामुळे अशा प्रवाशांनाही डिजिटल पेमेंटचा लाभ घेता येईल ज्यांच्याकडे बँक खाते किंवा KYC नाही. डिजिटल पेमेंट अधिक सोयीस्कर असतात हे आपण जाणतो. डिजिटल पेमेंटमुले प्रवाशांना रोख रक्कम बाळगण्याची किंवा तिकीट खरेदीसाठी रांगेत उभे राहण्याची गरज राहत नाही.
केवळ प्रवाशांनाच नाही तर सार्वजनिक वाहतूक प्रणाली देकील या आणावीं सुविधेमुळे अधिक आकर्षक बनते आणि प्रवाशांची संख्या वाढण्यास मदत होते. रिझर्व बँकेने KYC न करता PPIs जारी करण्याची मंजूरी दिल्यानंतर आता मेट्रो, बस, ट्रेन, जलमार्ग, टोल आणि पार्किंग या सारख्या सेवांसाठी Prepaid Wallet आणि कार्डद्वारे डिजिटल पेमेंट करता येणार आहे. देशात दररोज मोठ्या प्रमाणात लोकं सार्वजनिक वाहतूक वापरतात, त्यामुळे या नवीन निर्णयामुळे प्रवासी आणि वाहतूक सेवा दोघांनाही सामान फायदा मिळणार आहे.
PPI म्हणजे काय?
PPI हे एका प्रकारचे Digital Wallet आहे जे आपल्याला रोख रक्कम न घेता व्यवहार करण्याची सुविधा देते (Public Transport). आपण PPI मध्ये पैसे जमा करू शकता आणि ते नंतर खरेदी, बिल भरणे किंवा पैसे पाठवण्यासाठी ते पैसे वापरू शकता.