Pune Metro: पुण्यात मेट्रोची सुरुवात झाल्यापसून शहराला वेगळाच रूप आलं आहे. एखाद्या शहराच्या विकासासाठी काही गोष्टी महत्वाच्या असतात, ज्यात वाहतुक सेवा, वीज आणि पाणी, व्यवसायाच्या संधी इत्यादी अनेक गोष्टींचा समावेश असतो. पुण्यात दरवर्षी अनेक लोकं शिक्षण आणि व्यवसायासाठी येतात, ज्यामुळे शहरातील लोकसंख्या वाढत आहे, परिणामी वाढणारं ट्राफिक हा एक पुणे शहरचा मोठा प्रश्न बनला आहे. मेट्रोची सुरुवात ही शहराच्या विकासात भर घालत आहेच पण सोबतच वावरणाऱ्या माणसांसाठी हि सोय फायदेशीर ठरली आहे. आणि त्यातच आता पुणेकरांसाठी मेट्रो सेवेत सवलत देऊ केल्याने पुणेकरांचा आनंद द्विगुणित झाला आहे. .
Pune Metro देतेय तिकिटात 30% सवलत:
पुणेकरांना हि गोष्ट आनंद देणारी आहे. हल्लीच काही भागांमध्ये सुरु झालेल्या या मेट्रो सेवेने विद्यार्थ्यांसाठी नेहमीच सवलतीच्या दरान तिकीट उपलब्ध करवून दिले होते. मात्र आता इतर लोकांसाठी सुद्धा एक विशेष प्रकारची सवलत देऊ करण्यात आली आहे. आठवड्याच्या शेवटी म्हणजे शनिवारी आणि रविवारी मेट्रोच्या तिकिटात 30 टक्क्यांची सवलत देण्यात आली आहे. पुणे मेट्रोने X म्हणजेच Twitter या सोशल मिडिया प्लेटफॉर्मवरून हि बातमी सर्वांसमोर आणली. ” Weekend Discount” असे म्हणत त्यांनी 30% सवलतीची माहिती देत शनिवार आणि रविवारचा प्रवास सुखी केला आहे.
मेट्रोला मिळतोय उत्स्पुर्त प्रतिसाद:
मेट्रोची सेवा (Pune Metro) सुरु झाल्यापासून याला पुणेकरांनी भरपूर प्रतिसाद दिला आहे. बस सेवा सुरु असताना सुद्धा या नवीन वाहतूक सेवेला मिळालेला प्रतिसाद हा कौतुकास्पद आहे. शाळकरी मुलं किंवा कामावर जाणारी माणसं यांच्यासाठी हा प्रवास वेळ वाचवणाराच नाही तर कॅम्फर्टेबल सुद्धा बनला आहे. पुणे शहरात एखाद्या ठिकाणी वेळेत पोहोचणं म्हणजे वेळेच्या आधी निघणं भागच आहे, अश्या परिस्थितीत traffic ला मागे टाकत धावणारी मेट्रो रहिवाश्यांना मदत करत आहे.
आलेल्या माहितीनुसार गणेश चतुर्थीच्या काळात अनंत चतुर्दशी पर्यंत म्हणजेच 18 सप्टेंबर ते 28 सप्टेंबर पर्यंत मेट्रोने 1.41 करोड रुपयांची कमाई केली. पिंपरी चिंचवड ते सिविल कोर्ट पर्यंत मेट्रोने 63,23,718 रुपयांची कमाई केली, तर वनाझ पासून रुबी हॉल क्लिनिकपर्यंत 5,56,082 लोकांनी प्रवास केला, ज्यामुळे महा मेट्रोला 77,47,336 रुपयांचा फायदा झाला होता.