Pune News : गौतम अदानी पुण्यात येणार; PMPLचं चित्र बदलणार

Pune News : पुणेकरांची दुनिया म्हणजे PMPL, सकाळी सकाळी पुण्याच्या रस्त्यांवरून फिरणाऱ्या PMPL शिवाय पुणे अपूर्ण आहे. अलीकडेच यात भर पडली ती मेट्रोमुळे. आकाशाच्या जवळून धावणारी मेट्रो लोकांचा वेळ वाचवते, जीवन सोपं बनवते. पण मेट्रोमुळे बसच्या प्रवासात काही बदल घडले आहेत का? तर, नाही. आजही पुणे मेट्रो आणि पुण्यातल्या बस तेवढ्याच तुडुंब भरून प्रवास करतात. लक्ष्यात घ्या की या बस सेवांचे दोन प्रकार आहेत, एक डिझेलवर चालणारी बस आणि दुसरी इलेक्ट्रिक बस. आज पुणेकरांसाठी आम्ही एक खास बातमी घेऊन आलो आहोत, ती काय हे शेवटपर्यंत नक्की वाचा.

अदानींची पुणेकरांना भेट:(Pune News)

गौतम अदानी यांनी पुण्यातील PMPL सोबत एक करार केलेला असून परिणामी आता PMPLचं उत्पन्न वाढणार आहे. कदाचित तुम्हाला माहिती असेल की पुण्यात हळू हळू करून डिझेलच्या बसेस बंद होतील आणि त्यांच्या जागी केवळ इलेट्रीक बसेसची सुविधा उपलब्ध केली जाईल. एवढंच नाही तर गुगलचा वापर करून तुम्ही बस कुठे आहे याची देखील माहित मिळवू शकणार आहात. PMPL आणि अदानी यांच्यात झालेल्या करारामुळे 32.5 टक्क्यांचा फायदा PMPL ला मिळणार आहे, जो की एकूणच PMPLच्या सुधारणेत मदत करेल.

अदानी आणि PMPL यांच्यातील करारांतर्गत नवीन मार्ग शोधण्यात आलेत. सोबतच PMPL ची आर्थिक वाढ होण्यासाठी नवीन चार्जिंग स्टेशन्स उभारण्यात येतील, ज्यामध्ये पुणे आणि पिंपरी चिंचवड येथे एकूण 7 स्टेशन्स उभारण्याचा विचार आहे (Pune News). खास बाब म्हणजे अदानी समूहाने 4 स्टेशन्सच्या बांधणीचे काम सुरु देखील केले आहे, त्यामुळे येणाऱ्या काळात नक्कीच PMPL चे चित्र बदलताना पाहायला मिळेल.