PVR-Inox Collection : घरात सिनेमा बघणं आणि चित्रपट गृहात जाऊन चित्रपटाचा आनंद घेणं या दोन वेगवेगळ्या गोष्टी आहेत, खरा चित्रपट प्रेमी कधीच घर बसल्या चित्रपटाची मजा घेऊ शकत नाही. अश्या लोकांसाठीच काही दिवसांपूर्वी PVR सिनेमाने नवीन ऑफर आणली होती. या ऑफरचा फायदा करवून घेत आपल्याला एका महिन्यात दहा वेगवेगळे चित्रपट बघण्याची संधी उपलब्ध आहे. चित्रपट गृह जोरदार परागती करणार असेल तर त्याला गरज असते दर्जेदार चित्रपटांची. गदर आणि जवान हे दोन्ही चित्रपट लोकांच्या मनावर राज्य करून गेले, त्यामुळे PVR आणि Inox यांची भरपूर कमाई झाली ती कशी हे जाणून घेऊया….
PVR-Inox ची झाली भरगोस कमाई: PVR-Inox Collection
देशात मल्टीप्लेक्स चित्रपटगृहांची मोठी शृंखला आहे ती PVR आणि Inoxची. विविध भागांमध्ये Inox च्या इमारती पाहायला मिळतात, साधारण चित्रपटगृहांच्या तुलनेत PVR आणि Inox यांचं तिकीट जरी महाग असलं तर तिथे चित्रपटांचा मिळणारा आनंद देखील अनोखा असतो. हल्लीच आलेल्या जवान आणि गदर या दोन चित्रपटांनी प्रेक्षकांना वेड लावलं. आणि म्हणूनच PVR आणि Inox च्या बाहेर या चित्रपटांसाठी रांगा लागायच्या. या चित्रपटगृहांच्या देशभरात जवळपास 1,702 स्क्रीन्स आहेत, जे देशातील विविध राज्यांमध्ये पाहायला मिळतात. यंदाच्या वर्षी या चित्रपटगृहांची कमाई 2,023 कोटी रुपयांवर पोहोचला, जो कि आधी केवळ 702.4 करोड एवढ्या पर्यंतच सीमित होता.
हिंदी चित्रपटांचा वाटा अधिक:
यावर्षी जवान, गदर-2, रॉकी और रानी कि प्रेम कहानी यांसारखे चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला आले आणि प्रेक्षकांना ते आवडल्यामुळे या चित्रपटांची भरपूर वाहावा देखील करण्यात आली. बॉलीवूड व्यतिरिक्त मराठी चित्रपट क्षेत्रातून बाईपण भारी देवा किंवा तमिळमधला जेलर हे सिनेमेसुद्धा भरपूर गाजले. यावर्षी PVR ने केवळ जुलै ते सप्टेंबर या तीन महिन्यांमध्ये 1,335.8 कोटी रुपयांची कमाई (PVR-Inox Collection) केली. जर का तुम्ही मागच्या वर्षीचा आकडा पाहिलात तर तो फक्त 648 कोटी रुपये एवढाच होता. त्यामुळे एकंदरीतच हा वाढता आकडा चित्रपटगृहांसाठी फायदेशीर ठरतोय असे म्हणायला हरकत नाही.