PVR Inox Share : एखादा नवीन सिनेमा बाजारात आला म्हणजे प्रेक्षक सिनेमाघराच्या बाहेर रांगा लाऊन तयार असतात, आणि तो सिनेमा जर का प्रमुख आणि मोठा चाहतावर्ग असलेल्या अभिनेत्याचा असेल तर सिनेमाघरातील कर्मचाऱ्यांना फुरसत देखील मिळत नाही. भारतीय बाजारात सिनेमांना मिळणाऱ्या प्रेमामुळे भली मोठी कमाई केली जाते. सध्या बाजारात चर्चेत असलेले सिनेमे म्हणजेच रणबीर कपूरचा एनिमल आणि विकी कौशालचा सेम बहादूर आहेत. या दोन्ही सिनेमांचा आनंद घेण्यासाठी प्रेक्षकांच्या लागलेल्या रांगा PVR Inox च्या शेअर्समध्ये वाढ करवत आहेत.
चाहत्यांच्या प्रेमामुळे PVR Inox चे शेअर्स वाढले (PVR Inox Share):
तांत्रिकी बदल होत असलेल्या या काळात अनेक लोकं सिनेमाघरात जाऊन चित्रपटाचा आनंद घेण्यापेक्षा घर बसल्या OTT चा पर्याय निवडतात. मात्र काही सिनेमे हे प्रेक्षकांना घराबाहेर पडत तिकीट काढून चित्रपट पाहण्यासाठी मजबूर करवतात. सध्या प्रदर्शित झालेला एनिमल या याचेच एक प्रमुख उदाहरण आहे. रणबीर कपूर हा प्रेक्षकांमध्ये पसंत केला जातो, तसेच राश्मिका मंधना हि दक्षिणात्य अभिनेत्री दिवसेंदिवस प्रसिद्धी मिळवत असल्याने Box Office वर त्यांच्या एनिमल या चित्रपटाने धडाकेबाज कामगिरी करायला सुरुवात केली आहे.
शाहरुख खानला बॉलीवूडचा किंग म्हटलं जातं. त्यामुळे त्याचा कोणताही चित्रपट प्रदर्शित झाला तर भल्यामोठ्या रांगा लागून तिकिटांची विक्री होते. पठाण या किंग खानच्या चित्रपटाने अशीच भरगोस कमाई केली होती, मात्र वृत्तांच्या माहितीनुसार रणबीर कपूरच्या या नवीन चित्रपटाने पठाणला मागे टाकलं आहे. आत्तापर्यंत रणबीर आणि राश्मिकाच्या चर्चित चित्रपटाने जागतिक स्थरावर 116 कोटी रुपयांची कमाई करत नवीन विक्रम नोंदवला आहे (PVR Inox Share).
विकी कौशल शर्यतीत उतरला:
एनिमल बाजार गाजवत असतानाच विकी कौशल हा प्रमुख अभिनेता त्याचा नवीन चित्रपट घेऊन बाजारात उतरला आहे. सेम बहादूर या विकीच्या नवीन चित्रपटाने पहिल्याच दिवशी 6 कोटी रुपयांची कमाई केली होती. या विक्रमी कामगिरीचा फायदा PVR Inoxला झाला कारण यानंतर त्यांच्या स्टोक्समध्ये तेजी आली होती. चित्रपट पाहण्यासाठी प्रेक्षकांच्या गर्दीमुळे PVR चे शेअर्स (PVR Inox Share) शुक्रवारी 2 टक्क्यांनी वाढले. सध्या PVR चे शेअर्स 1742 रुपयांवर कामगिरी करत आहेत, मात्र या दोन्ही सिनेमांच्या आधी PVR चे शेअर्स केवळ 1430 रुपयांवर काम करत होते.
गेल्या महिन्यापर्यंत बाजारात PVR ला थोड्या नुकसानीचा सामना करावा लागला होता, कारण होते क्रिकेटचे विश्व चषक. आपल्या देशात क्रिकेटची वेगळीच नशा असल्यामुळे सिनेमागृहांच्या बाहेर लागणाऱ्या रांगा काही अंशी कमी झाल्या होत्या. मात्र एनिमल बाजारात आल्यानंतर सिनेमा घरांची परिस्थती पूर्ववत होत असून येणाऱ्या काळात PVRचे शेअर्स(PVR Inox Share) 2210 रुपयांपर्यंत पोहोचतील असं अंदाज लावला जातोय .